अनधिकृत धाबे ची तपासणी करून देशी व विदेशी दारूची होणारी विक्री बंद
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यामध्ये कुंटूर ,बरबडा ,हुस्सा, राहेर ,अशा विविध ठिकाणी तसेच नांदेड नायगाव हायवे लगत असणाऱ्या गावांमध्येही बिनधास्त परवाना नसतानाही अवैध धाबे असून त्या धाब्यावर देशी व विदेशी जोमात विक्री केली जात आहे . याकडे उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी परवाना दिला की काय असे चर्चा मात्र चांगलेच असून उत्पादन शुल्क अधिकारी या परिसरात कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत एकही कारवाई केली नसल्याने संशयित उत्पादन शुल्क अधिकारी च् संमती दिली आहे का अशी शंका व्यक्त केली जात आहे.
उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कुंटुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अनधिकृत धाबे ची तपासणी करून देशी व विदेशी दारूची होणारी विक्री बंद करावे. कुंटुर, धनज, सालेगाव, राहेर, देगाव, बरबडा, परिसरात जोरदार अनाधिकृत धाब्यावरही देशी दारू विक्री केली जात आहे.ऊतपादन शुल्क अधिकारी बिलोली चे कार्यालय सदैव बंद असते, त्यामुळे. तक्रार कशी करावी . अधिकारी बिलोली येथे रहात नाहीत. कुंटुर पोलीस ठाण्या अंतर्गत अनेक ठिकाणी अवैध देशी दारू व विदेशी दारूची विक्री होते आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवुन कुंटुर सह परिसरातील अवैध देशी दारू विक्री बंद करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा