रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ही गुत्तेदारांनी मनमानी केली
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरामध्ये रस्ता बांधकामासाठी करोडो रुपयांचा निधी देण्यात आला सदर कुंटूर फाटा ते राजगड नगर ते सुजले गावकडे जाणारा हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग समजला जातो. या रस्त्यासाठी कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून एक किलोमीटर ला एक कोटी असा निधीची तरतूद करण्यात आली व ह्या रस्त्याचे बांधकामही सुरू करण्यात आले असून रस्त्यावर डांबरीकरणाची पट्टी ही छोटी दहा फुटाच्या आतच हा डांबरीकरणाची पट्टी असून रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ही गुत्तेदारांनी मनमानी केली आहे .
रस्ता हा 20 फुटाचाही बनवला नसून साईट पट्ट्याही पाच पाच फूट नाहीत त्यातही पुलाच नळकांडी पुलाचे बांधकाम करून त्यात पाईप टाकून सिमेंटचे काम करण्यात येणार होते मात्र गुत्तेदारने सदर मातीमध्ये पाईप टाकून त्यावर डांबरीकरण रस्ता बनवला आहे .
त्यामुळे पुलाचे काम न करताच रस्ता बनवण्याचे आला असून पावसाळ्यामध्ये सदर पाण्यामुळे माती काम हे वाहुन जाऊन पुल वाहून जातील व नागरिकांना पुन्हा अडचणीचा सामना करावा लागेल अशी माहिती ही राजगड नगर, कोकलेगाव येथील नागरिकांनी दिली आहे. गुत्तेदारांनी सदर पुल बांधकाम करून पुलामध्ये पाईप टाकून चांगल्या प्रकारे बांधकाम करावे अशी मागणी राजगड नगर येथील नागरिकांनी केली.
नांदेड येथील गुत्तेदार हंबर्डे असल्याचे सांगण्यात येत आहे सदर गुत्तेदारास फोनवरून माहिती घेण्यास फोन केला असता फोन उचलण्यास तयार नसून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जेई हे सुद्धा फोन घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे रस्ता च्या नावाखाली लाखो रुपयाची लुट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा