नांदेड लोकसभा मतदरासंघाचा प्रचार अतिम टप्प्यात आला
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
अण्णाभाऊ साठे यांचे नातू तथा शिवसेनेचे (उबाठा) स्टार प्रचारक सचिन साठे यांची महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज नायगांव येथे सकाळी ११ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
नांदेड लोकसभा मतदरासंघाचा प्रचार अतिम टप्प्यात आला असताना प्रचारासाठी फक्त दोन दिवस शिल्लक राहिले असून नांदेड लोकसभा काॅग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी अण्णाभाऊ साठे यांचे नातू तथा शिवसेनेचे (उबाठा) स्टारप्रचारक सचिन साठे यांची नायगांव येथे महाराष्ट्र मंगल कार्यालय नरसी रोड नायगाव येथे २३ एप्रिल रोजी जाहीर सभा ठेवण्यात आली आहे. सचिन साठे यांना महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेसाठी समाजाला मार्गदर्शन व्हावे कारण पुरोगामी धर्मनिरपेक्ष असलेल्या महाराष्ट्रातील थोर प्रतिभावंत लेखक सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे ते नातू असून त्यांच्या संघटनेमधून काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगले बळ मिळणार आहे, म्हणून प्रचारार्थ बोलवल जात आहे.
आज नायगाव येथे होत असलेल्या सभेसाठी नांदेड लोकसभेचे उमेदवार वसंतराव चव्हाण, राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे.काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष हानमंतराव बेटमोगरेकर, उपनगराध्यक्ष विजय चव्हाण, काॅग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष संभाजी भिलवंडे,प्रा.रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष राज क्षिरसागर यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असून सचिन भाऊ साठे यांच्या जाहीर सभेसाठी जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे, मराठवाडा सचिव कीशोर कवडीकर, जिल्हाकार्यध्यक्ष संजय बोथीकर युवा जिल्हाध्यक्ष अविनाश आंबटवाड, जिल्हाउपाध्यक्षा द्रोपताताई कांबळे, जिल्हाउपाध्यक्ष आकाश सोनटक्के, अक्षय बोयाळ, पूनम धमनवाडे, राजेंद्र रेड्डी, मारुती गायकवाड,परमेश्वर वाघमारे, जिल्हा संघटक आकाश घोडजकर , शिवाजी बोईनर यांनी केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा