maharashtra day, workers day, shivshahi news,

नांदेड जिल्ह्यातील लोकांना मोदी घाबरले, म्हणून ते नांदेडात आले, नाना पटोले

सभेला मतदार बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती 
Nana Patole , Public meeting held at Narsi for campaigning of Congress candidate Vasantrao Chavan , nanded ,shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
भारत जोडो पदयात्रेमध्ये राहुल गांधी यांनी शेतकरी कष्टकरी वंचित गोरगरीब लोकांना भेटले कारण कांग्रेस पक्ष हा पूर्वीपासूनच सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे, भाजपाच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात जनता विविध समस्याला तोंड देत आहे जनतेच्या जीएसटीचा पैसा भाजपाच्या मेहेरबानीने अदाणी,अंबानी यांच्या घरात जातो, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले तर ये हरामी सरकार सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे, याबाबत लोकांना बदल हवा आहे म्हणून लोक काँग्रेसच्या बाजूने असल्याने त्यांना मोदी घाबरले आणि नांदेडला आले, भाजपाच्या सभेत पैसा देऊन लोकांना आणले जाते तर काँग्रेस सभेला लोक स्वंयस्फुर्तीने येतात, असे प्रखड मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
नांदेड लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ नरसी येथे आयोजित जाहीर सभेत काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, उमेदवार वसंतराव चव्हाण, राष्ट्रवादीच्या आशाताई भिसे, सुरेंद्र घोडजकर, प्रा. मनोहर धोंडे, भास्कर पाटील भिलवंडे रवींद्र पाटील भिलवंडे,प्रा.रामचंद्र भरांडे, भीमराव जेठे, माधवराव नरवाडे, मोहन पा.धुपेकर, लक्ष्मण भवरे, शिवाजी पाचपिपळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रस्ताविक संभाजी पाटील भिलवंडे यांनी केल्यानंतर दत्तात्रय आईलवार निळकंठ कुरे, लालबा सूर्यवंशी, इसाकभाई नरसीकर, सदाशिव बोडके, फारुखभाई पाशा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
पटोले बोलताना पुढे म्हणाले की मोदींनी चीन मधून कोरोना आणल्यामुळे कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे, भाजपाचा खरा चेहरा लोकांना कळाला आहे म्हणून आमच्यातील कावळा मोदींना निवडून देण्यासाठी फितूर झाला असला तरी पालघर मधील महिला राशन मधील साड्या परत केले तर अकोला मध्ये बुद्ध विहारात बौद्ध बांधव यांनी शपथ घेतली की मताचे विभाजन होऊ नये म्हणून संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही काँग्रेस सोबत आहोत असेही ते सभेत जाहीर केले. यावेळी श्रीनिवास पाटील चव्हाण, प्रा.रवींद्र चव्हाण, संजय बेळगे, रेखाताई बनसोडे, माधव कोरे, शिवराज वरवटे, चंद्रकांत आईलवार यासह मतदार बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तर सूत्रसंचालन व आभार बालाजी शिंदे यांनी केले.

काँग्रेस पक्षाने तळहाताच्या फोडाप्रमाणे अशोक चव्हाण यांना जपलं पण ते गद्दारात मिसळले, देशात लोकशाही जिवंत ठेवायची की हुकूमशाही आणायची हा तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल,आ.  पवार मला बाजारातील दलाल म्हणतात अशा हलकट माणसाला मी उत्तर देत नाही.
  उमेदवार वसंतराव चव्हाण 

 


चिखलीकर हा सहा पक्षातून फिरून आलेला राहू आणि भाजपात दबून बसलेला केतू यांना हटवून सर्वांना सोबत घेऊन चालणारे सर्वांच्या सुखदुःखात सहभागी असणारे वसंतराव चव्हाण यांना निवडून देण्यासाठी लिंगायत समाज सोबत राहणार आहे.
 प्रा. मनोहर धोंडे 
आ.राजेश पवार हिजड्यांचे पैसे घेतो, डान्सबार चालवितो, काँग्रेस मधून गेले ते कावळे राहिले ते मावळे, आम्ही तुमच्या सदैव काँग्रेस सोबत.
 मतदारातील आवाज

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !