आमदार राम सातपुते यांना भरघोस मतांनी आणणार निवडून - देवेंद्र कोठे यांचा निर्धार
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (प्रतिनिधी जगदीश कोरीमठ)
माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या पुढील राजकीय प्रवासाचे पालकत्व मी घेत असून त्यांच्या पुढील सकारात्मक राजकारणाची जबाबदारी माझी असेल. देवेंद्र कोठे यांनी लोकसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारात सक्रिय व्हावे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
बुधवारी सकाळी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी भेट घेतली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, देवेंद्र कोठे हे सोलापूरच्या राजकारणातील आश्वासक नेते आहेत. विकासाची जाण असलेले, जनमानसात लोकप्रिय असलेले आणि उत्तम संघटक असलेले देवेंद्र कोठे यांनी भाजपासोबत येण्याचा निर्णय केल्यामुळे भाजपचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. आगामी काळात सोलापुरातील अनेक नेते भाजप आणि महायुती सोबत येणार आहेत. माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांचा भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांना सर्वस्तरातून मिळत असलेल्या कामाची पावतीच आहे.
माजी नगरसेवक देवेंद्र कोठे म्हणाले, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या पुढील सकारात्मक राजकीय प्रवासाची जबाबदारी आणि पालकत्व घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख राजकारणाने प्रेरित होऊन आम्ही भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पूर्ण ताकदीनिशी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रसंगी भाजपचे शहर उपाध्यक्ष जय साळुंखे, रमेश यन्नम आदी उपस्थित होते.
भाजपाची वाढली ताकददेवेंद्र कोठे यांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयामुळे भाजपची ताकद वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार देवेंद्र कोठे यांनी केल्यामुळे शहर मध्य आणि शहर उत्तर मतदारसंघातून भाजपाला मिळणाऱ्या मताधिक्यात वाढ होणार आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा