लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिमा सुरक्षा बलाच्या जवानांसह पोलिसांनी पथसंचलन काढले
शिवशाही वृत्तसेवा हींगोली जिल्हा प्रतिनिधी , चंद्रकांत वैद्य
औंढा नागनाथ - आगामी काळात येणारे सण, उत्सव आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिमा सुरक्षा बलाच्या जवानांसह पोलिसांनी औंढा नागनाथ शहरातील प्रमुख मार्गाने पथसंचलन काढले. सिमा सुरक्षा दलाच्या जवानांसह पोलिसांचे शहरातील पोलीसठाणे ,कासारगल्ली ,रहीम चौक,जोशी गल्ली,नगरपंचायत रोड, देशमुख गल्ली, स्व.रंगनाथ बंगाळे,डाँ हेडगेवार चौक,स्व.मिनाताई ठाकरे चौक,नागनाथ मंदीर ,बसस्थानक या मार्गेने शुक्रवारी पथसंचलन काढले. हे पथसंचलन पोलीस अधीक्षक जी, श्रीधर ,अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणपत राहीरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या पथसंचलनात सिमा सुरक्षा बलाचे डिवायएसपी आर.के. मिना , पिएसआय सागर माल , पोलीस निरीक्षक राहीरे , सपोनि बालाजी महाजन , पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, पोलीस उपनिरीक्षक मिथुन सावंत ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अफसर पठाण , जमादार सुभाषराव जयताडे , दिलीप नाईक , विश्वनाथ ढोणे, किशोर पारीसकर यांच्यासह पोलीस कर्मचारी ,सिमा सुरक्षा बलाचे जवान सहभागी झाले होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा