maharashtra day, workers day, shivshahi news,

उपविभागीय कार्यालयातील स्वाक्षरी मोहिमेला अल्प प्रतिसाद

अधिकारी, कर्मचार्यांनी फिरवली पाठ 
Short response to the signature campaign in the Sub-Divisional Office , Hingoli , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी,  चंद्रकांत वैद्य
हिंगोली -  हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेत अधिकारी, कर्मचार्यांनी पाठ फिरविल्याने स्वाक्षरी मोहिमेला पहिल्याच दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला.
जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात मी मतदान करणारच या अभियान अंतर्गत स्वाक्षरी फलकाचे उदघाटन उमाकांत पारधी यांच्या हस्ते आज करण्यात आले. मात्र या स्वाक्षरी फलकावर पहिल्याच दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला असून स्वाक्षरी करण्यासाठी कर्मचार्यांनी पाठ फिरवली. 
दरम्यान मतदानाचा हक्क सर्वांना मिळावा हा उद्देश असून कार्यालयात स्वाक्षरी मोहीम ही केवळ नावालाच वापरली जात आहे. याचा उपयोग ग्रामीण जनतेला होत नाही. ही मोहीम ग्रामपंचायत स्तरावर राबविली पाहिजे असताना केवळ देखावा म्हणून राबविण्यात आली काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !