निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर जिल्हा प्रतिनिधी, सुदाम दरेकर
पारनेर नगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके स्वाभिमान जनसंवाद यात्रा सोमवारपासून सुरू होणार आहे पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडापासून या यात्रेला सुरुवात होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत या यात्रेला सुरुवात होत आहे. नगर लोकसभा मतदारसंघासाठी पारनेरचे आमदार निलेश लंके यांची महाविकास आघाडी करून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. तसेच निलेश लंके यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटीसाठी सुरू केले आहेत. यादी निलेश लंके यांची पत्नी राणी लंके यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघामध्ये जनसंवाद यात्रा काढली होती.
त्यानंतर आता निलेश लंके हे आज सोमवारपासून स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू करत आहेत. व मोहटा देवी गडापासून या यात्रेला सुरुवात होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील, आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समन्वयक अंकुश काकडे, राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे सचिव ऍड प्रताप ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या यात्रेचा शुभारंभ होत आहे. निलेश लंके प्रतिष्ठान च्या वतीने यात्रेची जय तयारी करण्यात आली आहे. नगर लोकसभा मतदारसंघातील तालुके आणि गावागावात ही यात्रा जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून निलेश लंके जनतेशी संवाद साधणार..
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा