maharashtra day, workers day, shivshahi news,

नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला मत द्या----- खासदार अशोकराव चव्हाण

"अबकी बार चारशे पार" हा असा नारा सभेत  दिला
MP Ashokrao Chavan , The slogan "Abki Bar Charshe Par" was raised in the meeting , Prataprao Patil Chikhlikar ,nanded ,shivshahi news.



शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी,  शिवाजी कुंटूरकर
भारताचे नाव जगाच्या पटलावर गाजवणारे देशाचे विकसित महापुरुष नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी प्रतापराव पाटील चिखलीकर यांना बहुमताने विजयी करुन भारताचा सर्वांगीण विकास "अबकी बार चारशे पार" हा नारा दिला.या चारशे मध्ये नांदेडचे प्रताप पाटील चिखलीकर असणारच आहेत. विकसित भारताचे मोदीजीच्या स्वप्न पूर्ती साठी भाजप ला मत द्या व भरघोस मतांनी प्रतापराव पाटील चिखलीकर यांना विजयी करा असे विचार खा. अशोकराव चव्हाण यांनी नरसी येथील सभेत मार्गदर्शन व्यक्त करताना  केले.
 भाजपने एका जिल्ह्यात पाच खासदार  दिलेत. आणि एकाच वेळी दोघांना राज्यसभेवर संधी दिली आणखी काय पाहिजे. विरोधी बाकावर बसून विकास होत नसतो. पक्षात नवीन आले म्हणजे कोणावर अन्याय होत नाही तर कामाची व्यापकता वाढत आसते. नांदेडचा सर्वांगीण विकास साधायचा असेल  व विकसित भारताचे मोदिजीच्या स्वप्न पूर्ती साठी भाजपला मत देण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी केले.
ते तालुक्यातील मौजे नरसी येथे बिलोली रोडवर शिव पार्वती मंगल कार्यालय येथे आयोजित बूथ प्रमुख ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटी सदस्यांचा मेळावा प्रसंगी बोलत होते. नायगाव च्या चव्हाणांच्या आपल्या नावाचा वापर करण्यावर ते पुढे बोलताना  म्हणाले कि, "नांदेड चे चव्हाण- नायगाव चे चव्हाणां मध्ये फरक आसतो. कोण चव्हाण कसे आहेत हे नायगावकरांना इतरा पेक्षा अधिक सांगण्याची गरज नाही. गतवेळी मी व नायगाव चे चव्हाण विरोधात असताना प्रतापरावांना येथून 22500 ची आघाडी दिली होती. यावेळी मी चिखलीकर सोबत आहे. यामुळे येथून पन्नास हजार च्यावरआघाडी भाजपला मिळेल यात शंका नाही असेही ते म्हणाले. 
यावेळी  भारतीय जनता पक्ष व युती पक्षाचे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर, भास्करराव पाटील खतगांवकर, आमदार राम पाटील रातोळीकर, देविदास भाऊ राठोड, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा साहेब,अविनाश घाटे, चैतन्य बापू देशमुख, प्रवीण साले,( शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे गंगाधरराव बडुरे,) मारोतराव कवळे गुरुजी, अशोक पाटील मुगांवकर, उमाकांत मालक देशपांडे, माणिकराव लोहगावे,(अजित पवार गटाचे वसंत पाटील सुगावे,) कैलास भाऊ गोरठेकर, संजय कुलकर्णी, सुधाकर
देशमुख धानोरकर, विक्रम देशमुख
तळेगावकर, भाऊसाहेब देशमुख गोरठेकर, अमोल पाटील ढगे, रुपेश देशमुख कुंटूरकर, विठ्ठल पाटील, बालाजी मदेवाड, सौ. मिनाक्षी कागडे,( रिपाई आठवले गटाचे गंगाधर गायकवाड, धम्मदीप भद्रे.) प्रकाश पाटील भिलवंडे व तसेच उपस्थित मान्यवर सर्व बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख ग्रामपंचायत सदस्य सेवा सोसायटी सदस्य सरपंच चेअरमन व सर्व भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.       
     या कार्यक्रमाचे आयोजक शिवराज पाटील होटाळकर, श्रावण पाटील भिलवंडे, बालाजी बच्चेवार राजेश कुंटूरकर, यांनी व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी यशस्वीरित्या आयोजन करीत व परिश्रम घेत कार्यक्रम सुरेख व भरगच्च गर्दीत यशस्वी रित्या केले. कार्यक्रमाचे संचलन विजय होपळे यांनी तर आभार धनराज शिरोळे यांनी मानले.
अशोकराव चव्हाण व प्रतापराव पाटील चिखलीकरांचे नरसी चौकात भव्य स्वागत
जेसीबी द्वारे फुलांची उधळण व भव्य पुष्पहार घालून फटाक्याच्या अतिषबाजीत श्रावण पाटील भिलवंडे व मित्र मंडळ यांनी फटाक्याच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत केले.प्रतापराव व अशोकराव भाजप च्या एकोप्याने एकत्र आल्या नंतर श्रावण पाटील यांनी प्रथमच होणाऱ्या या मेळाव्याची जय्यत तयारी करीत स्वागताचे बॅनर लावत जोरदार स्वागत केले.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !