निधन वार्ता
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
तीन दिवसापूर्वी अपघातात जखमीझालेले नायगांव येथील व्यापारी शिवकुमार भागवतराव मेडेवार रा.बेळगे नगर नायगाव (52) यांचे उपचारादरम्यान नांदेड येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दि. 10 मार्च रोजी रविवारी सकाळी 10 : 30 वाजता नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
नायगाव येथील व्यापारी असलेले शिवकुमार मेडेवार यांचे बेळगे नगर पाटीजवळ भरधाव येणाऱ्या एका मोटरसायकलस्वाराने दि. 7 मार्च रोजी सायंकाळी जोराची धडक दिली होती. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना तातडीने नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दि.09 मार्च रोजी सायंकाळी त्यांचे निधन झाले.
दि. 10 मार्च रोजी रविवारी सकाळी नायगाव येथील आर्य वैश्य समाजाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
नायगाव शहरातील शिवकुमार मेडेवार हे हिंदू चळवळीत सक्रीय कार्यरतअसणारे व्यापारी एक सच्चा मित्र व मार्गदर्शक हरपला अशी प्रतिक्रियाभाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य --- बालाजी बच्चेवार यांनी दिली.....!----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा