14 मार्च रोजी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील स्वच्छ गाव सुंदर गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेळगाव (गौरी) तलाठी सज्जाच्या कर्तव्यदक्ष तलाठी श्रीमती ज्योती मुकुंदराव करवंदे यांना संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्था टाकळी (बु.)तालुका नायगांव जिल्हा नांदेड यांच्या वतीने दिला जाणारा 2024 चा नरसी गटातील "आदर्श तलाठी संकल्प पुरस्कार " जाहीर करण्यात आला आहे .
तलाठी श्रीमती ज्योती मुकुंदराव करवंदे ह्यनायगांव तहसील कार्यालया अंतर्गत शेळगाव गौरी. टाकळी बु.भोपाळा.धुप्पा.धानोरा त.मा. व अतिरिक्त पदभार कुचेली.येथील तलाठी सज्जावर काम करत असतानां अतिशय अल्प कालावधीमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सदरील पुरस्कार त्यांना प्राप्त झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या पुरस्काराचे वितरण दिनांक 14 मार्च रोजी धुप्पा तालुका नायगांव येथील ई - लर्निंग स्कूल च्या मैदानावर विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा