गोपु पाटील यांनी काल प्रशासनाला इशारा दिला
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
आखाडा बाळापुर - शिवसेना हिंगोली जिल्हाप्रमुख अजय ऊर्फ गोपु पाटील यांनी काल प्रशासनाला इशारा दिला होता की ज्या निधीतून जिल्ह्यातील ग्रामिण भागाचा विकास करायचा असतो तो निधी शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी व मागे झालेल्या महा सांस्कृतिक महोत्सवाला ३४ जिल्ह्यात प्रत्येकी अडीच कोटी कोटी रुपये खर्च करून या सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे त्याचा निषेध म्हणून मुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखविण्यात येईल असा इशारा दिला होता .
त्यामुळे शिवसेना हिंगोली जिल्हाप्रमुख अजय ऊर्फ गोपु पाटील यांच्यासह शिवसेना उपजिल्हासंघटक सोपान पाटील, शाखाप्रमुख रुपेश सुर्यवंशी, सुनील सावंत, विलासराव गांजरे, अतहर पठाण,इम्रान पठाण ,शंकरराव सावंत,तौसीफ पठाण, ज्येष्ठ शिवसैनिक भगवान सावंत, युवासेना शाखाप्रमुख अनिल सावंत, दिपक सावंत, शेख निसार, बापूराव सावंत, अक्षय सावंत,नानु सावंत, राज सावंत, पिंटू देशमुख,शेख रहीम, साई सावंत यांच्या सह अनेक शिवसैनिकाना डोंगरकडा पोलीस चौकी येथे पोलीस प्रशासनाने त्यांना नजर कैदेत ठेवले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा