मराठा अरक्षणावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आक्रमक
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली - मराठा अरक्षणावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले असून ,रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलन कर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात बसविले.
जिल्हा प्रशासनाने येथील रामलीला मैदानावर रविवारी शासन आपले दारी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी डीपीसीच्या निधीतून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करीत हा कार्यक्रम झाला. मात्र जिल्ह्यात अनेक विकासाची कामे असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत शासनाच्या कार्यक्रमासाठी जनतेचा निधी खर्च केल्या जात आहे. यावरून उद्धव ठाकरे गटाने मुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखविण्याचा निर्धार केला होता. परंतु मुख्यमंत्री यांचा ताफा येताच काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विनायक भिसे सह ,राजू पाटील यांच्यासह अनेक आंदोलक कर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा