पुरस्कार देविदास खरात यांना जाहीर
हिंगाेली (प्रतिनिधी): शिवशाही वृत्तसेवा न्यूज चंद्रकांत वैद्य
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देउन सम्मानित करण्यात येते. यावर्षी समाज कल्याण विभागाच्या वतीने दिला जाणारा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारासाठी हिंगाेली जिल्यातील सामाजिक कार्यकर्ता देविदास खरात यांना जाहीर करण्यात आला आहे.
. समाज कल्याण विभागामार्फत सदर पुरस्कार दिनांक 12 मार्च 2024 रोजी मुंबई येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, जमशेद भाभा नाट्यगृह एन सी पी ए मार्ग नरिमन पॉईंट मुंबई येथे आयाेजित करणयात आलेल्या कार्यक्रमात वितरित करण्यात येणार आहे. या पुरस्कार साेहळयासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहे. देविदास खरात यानंा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव तथासमाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड समाज कल्याण निरीक्षक वडकुते, नितीन राठोड, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय निलावार, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे आदि ने त्यांचे अभिनंदन केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा