शासन आपल्या दारी हा शासनाच्या वतीने कार्यक्रम पार पडला
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली - शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह ,पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांनी हजेरी लावल्याने अख्खी सरकारी यंत्रणा दिवसभर मुख्यमंत्र्यांच्या दिमतीला उभी केली होती.
रविवारी शासन आपल्या दारी हा शासनाच्या वतीने कार्यक्रम पार पडला खरा यासाठी तीन दिवसांपासून बैठकावर बैठका घेत जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व अधिकारी यांनी समन्वय साधून कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रविवारी मुख्यमंत्री यांनी जमलेल्या नागरिकांना मार्गदर्शन केले.विविध योजनांचा पाढा वाचला , जिल्हा प्रशासनाने देखील इतर सांस्कृतिक कार्यक्रम न घेता लावणीचा कार्यक्रमावर लाखो रुपयांची उधळपट्टी करीत अकलेचे तारे तोडल्याने महिला मध्ये नाराजीचा सुर पहावयास मिळत होता.
जिल्हा प्रशासनाच्या नियोजन शुन्य कार्यक्रमामुळे गोंधळ उडाला, पासेस देण्याचे काम पोलीस विभागाकडे देण्याचे ठरले असताना कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच शनिवारी जिल्हा माहिती कडे बोट दाखवत जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाने टोलवाटोलवी केल्याने पत्रकार सह पक्षाचे पदाधिकारी ही नाराज झाले असल्याचे चित्र होते. एकंदरीत जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर संतप्त नागरिकांतून रोष व्यक्त केला जात होता.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा