मुख्याध्यापक आशिष पिंगळकर यांनी योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी , चंद्रकांत वैद्य
हिंगोली- डोळस, जाणकार व शारीरिक अवयवाने परीपूर्ण असलेल्या व्यक्तींना विविध माध्यमातून योग शिकण्याच्या संधी उपलब्ध असतात परंतु दृष्टीहिन, मतिमंद, दिव्यांग विद्यार्थ्यांना देखील ही संधी उपलब्ध व्हावी आणि त्यांनाही उत्तम आरोग्या लाभावे यासाठी मुख्याध्यापक आशिष पिंगळकर यांनी पुढाकार घेऊन स्व. ओमप्रकाश देवडा यांच्या पुण्यतिथी निमित्त मातोश्री गंगादेवी देवडा निवासी अंध मुलांचे विद्यालय, हिंगोली येथे मुलांसाठी पतंजली योग समिती व जाइन्ट्स ग्रुपद्वारे दि ४ ते ८ मार्च पर्यंत योग प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी स्व.ओमप्रकाश देवडा यांच्या प्रतिमेस मानवंदना अर्पण करून योग शिबिराची सुरवात झाली. यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ओमप्रकाश भाऊंच्या कार्याची व शाळेबद्दलची माहिती प्रास्ताविकातून मुख्याध्यापक पिंगळकर यांनी दिली. त्यानंतर योग शिक्षकांनी मुलांना योग, आसन व प्राणायाम याचे महत्व मनोगतातून विद्यार्थ्यांना सांगितले. विठ्ठल सोळंके, बाळासाहेब हरण, रत्नाकर महाजन, डॉ.संजय नाकाडे , उमेश तोष्णीवाल, पत्रकार श्याम सोळंके , वामन टाकळगव्हाणकर , प्रा.अनंत पठाडे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच मुलांना योगासन व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यानंतर त्यांच्याकडून योग्य सराव करून घेतला.
दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी पतंजली महिला प्रभारी ज्योती शेळके सह योगशिक्षक रमेश काळे, मंगल काळे, शारदा चव्हाण, कविता मदिलवार, साहेबराव राखुंडे, अशोक पवार आदींनी विद्यार्थ्यांकडून योगासने व प्राणायाम करून घेतले. यावेळी शाळेचे कर्मचारी ज्ञानोबा गव्हाणे, सुमित दुबे , संदीप कुडे , ऋषी पांचाळ , दिपक बहातरे , प्रकाश वजीर, छाया वानखेडे , वाघमारे यांची उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा