शाळा व्यवस्थापन समितीचे सीईओना साकडे
शिवशाही वृत्तसेवा, हींगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली - अंतुलेनगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील रिक्त पदावर झालेली नियुक्ती रद्द करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीने बुधवारी जिल्हा परिषदेचे सीईओ संजय दैने यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद केले की, अंतुलेनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत रिक्त पद भरणे असल्याने इतर ठिकाणाहून अनिता नरसैया संगेवार यांची नियुक्ती शिक्षण विभागाने केली. मात्र ती नियुक्ती रद्द करावी अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे. यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीने संबंधित शिक्षिकेची नियुक्ती रद्द करण्याचा ठराव घेतला आहे. या ठरावात नमूद केले की सदरील शिक्षिका ही वेडसर असून मानसिक संतुलन बिघडलेले असते त्यामुळे या शिक्षिकेची दिलेली पदस्थापना रद्द करण्यात यावी असेही बैठकीत ठरल्याने बुधवारी शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी यांनी जिल्हा परिषदेत धाव घेऊन सीईओ ,प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन त्या शिक्षिकेची नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे.
निवेदनावर पप्पू चव्हाण, सुखदेव माने, यमुना गाडे, सुमन सोमटकर, मनोज लिंबेकर, दीपाली इंगोले, ज्योती जावळे, माधव भवर , मीना धबडगे, संजय काळे, प्रकाश नेतने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा