या कार्यक्रमास संघटनेतून सर्व पदाधिकाऱ्यांचा सहभाग
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली येथील जुन्या पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, पोलीस अंमलदार बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष शेषराव चव्हाण, कार्याध्यक्ष शिवाजी विरकर, उपाध्यक्ष गंगाधर इंगोले, उपाध्यक्ष शेख,जमिरोधीन मो. हाफिजोधीन शेख, सचिव मुकुंद इंगोले,
सहसचिव रमेश सुरदुसे, कोषाध्यक्ष बालाजी बोके, सुभाष सोळंके, प्रकाश गिरे, दशरथ सारगो,के .एम.पठाण, आदींची उपस्थिती होती. यावेळी, हिंगोली नांदेड, परभणी येथील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, पोलीस अंमलदार हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल भडंगे यांनी केले, तर सुत्रसंचलन स्वप्नील देशमुख यांनी केले. तर आभार बालाजी बोके यांनी केले..
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा