अन्यथा विश्व हिंदू परिषदेचा आंदोलनाचा इशारा
हिंगोली - गोहत्या बंदीवर पोलीस अधीकरी सबसेल अपयशी ठरत असल्याने गोहत्याचे प्रमाण वाढत आहे. कसायांना पाठीशी घालणाऱ्या संबधीत पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करून जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अन्यथा विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले की, प्राणी संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्यानेच राज्यात दररोज हजारो गोवंस्याची कत्तल केले जाते आहे. तसेच परराज्यात देखील निर्दयी पणे गोवंस्याची वाहतूक होत आहे. पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने असे प्रकार वारंवार होत आहेत. पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी गोपालक किंवा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून गोवंस्याची निर्दयी वाहतूक करणारे ट्रक पकडल्या जाते. त्यानंतर पोलिसांना जाग येते. मार्गदर्शक सूचनांची देखील पोलीस प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जात नाही. असा आरोप करून गोवंशाची वाहतूक करणाऱ्या मालका ऐवजी केवळ ट्रक चालकांवर गुन्हा दाखल केला जातो.बहुतांश पोलीस हे यामध्ये कसायाना मदत करतात त्यामुळे दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले जाते.यावर अंकुश घालण्यात पोलीस प्रशासन सबशेल अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत यापुढे प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी यांची नियुक्ती करावी, त्यानंतरही गोहत्या होत राहिल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला आहे.
निवेदनावर विहिप जिल्हाउपाध्यक्ष सावरमल अग्रवाल, बद्रीनारायण सारडा, विभाग प्रसार प्रमुख राजेंद्र हलवाई, ताराचंद धुत, प्रकाश सोनी, ज्ञानेश्वर महाराज, अमोल देशमुख, महेश बियाणी, विजय शिंदे, मोहन चव्हाण, छत्रपती पोले, राम हाराळ, शैलेश नांदेडकर, विश्वनाथ बोराळे, यांच्यासह बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा