औंढा नागनाथ येथून येणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लव्हाळा फाट्याजवळ पावर हाऊस समोर भरधाव वेगात असलेल्या आयशर आणि कारच्या धडकेत बुलढाणा येथील एकाचा मृत्यू, तर तीन जण जखमी झाल्याची घटना ९ मार्च रोजी सकाळी ३ वाजेदरम्यान घडली. या घटनेतील मृतक युवकाचे नाव वैभव रामकृष्ण लोखंडे रा. सुंदरखेड, बुलढाणा आहे.
बुलढाणा शहरालगत असलेल्या सुंदरखेड येथील वैभव रामकृष्ण लोखंडे, सागर एकनाथ सुरुशे, आदित्य गजानन सुरुशे आणि अविनाश पंजाब गव्हाणे सर्व रा. बुलढाणा हे एलआयसीचे काम काम करतात. दरम्यान, ८ मार्च रोजी एमएच २८-बीके १७९५ या क्रमांकाच्या कारने औंढानागनाथ येथील औंढेश्वराच्या दर्शनासाठी गेले होते. रात्री दर्शन करुन परत येत असताना लव्हाळा फाट्याजवळ स्टेट बँकेचे लॉकर घेऊन धुळे येथून हैदराबादला जाणारा एमएच १८- बीजी ८२२५ या आयशर चालक सुनिल कोळी रा. धुळे याने कारला जोरदार धडक दिली.
या अपघातात गाडीतील वैभव रामकृष्ण लोखंडे याचा चिखली येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातातील सागर एकनाथ सुरुशे, आदित्य गजानन सुरुशे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचेवर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. तर अविनाश पंजाब गव्हाने हा किरकोळ जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार स्वप्निल नाईक, पोहेकॉ कडूबा डोईफोडे, पोकॉ लक्ष्मण ईनामे, पोकॉ राजेश गीते यांनी घटनास्थळी जाऊन सर्व जखमींना चिखली येथे उपचारासाठी पाठविले. दरम्यान पोलिसांनी आयशर चालकास ताब्यात घेतले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा