मुलांना उच्चशिक्षित करणार्या मातांचा सन्मान
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
औंढा नागनाथ शहरातील शासकीय विश्रामगृह येथे अँक्शन एड, मानवी हक्क अभियान व लोकराज्य ह्युमन डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आपला मुलांना उच्चशिक्षित करणार्या मातांचा सन्मान करण्यात आला.
सुरुवातीला महापुरुषांच्या व महामातेंच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उद्घाटन डॉ.त्रप्ती गजानन वाशीमकर यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.शितल अमोल धुमाळ होत्या तर मार्गदर्शक रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष सरपंच किरण घोंगडे उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून शोभाताई मोगले, श्रीमती शांताताई भालेराव, जान्हवी श्रीरसागर,सौ.स्वाती गजानन वाखरकर, शांता सुनील चव्हाण ,सौ.सविता दतराव घोडके, सुनिता संजय जाधव,सौ.ज्योतीमाला काशिदे,सौ.त्रीशन घोंगडे, सुजाता घोंगडे, कमलताई घनसावंत, रेखाताई सरोदे, छायाताई धवसे,
प्रास्ताविक मुख्य आयोजक मानवी हक्क अभियानच्या जिल्हाध्यक्ष तथा लोकराज्य सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा राधिकाताई चिंचोळकर यांनी केले.
सदरील सन्मान सोहळ्यात एकशे एक आदर्श मातांचा पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
मोठ्या संख्येने तालुक्यातील व शहरातील महिलांची उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा