2024 सालच्या निवडणुकीत सगळ्यांना मतदान करण्याचा हक्क
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी आरिफ शेख
आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच ८० पेक्षा जास्त वय असणारे आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक विकलांग असणाऱ्या नागरिकांना घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड यांनी पत्रकार
परिषदेत दिली. आगामी लोकसभा निवडणुक२०२४ च्या अनुषंगाने आज ६ मार्च रोजी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी समाधान गायकवाड यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी सांगीतले की, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यातील सर्वात जास्त मतदारांची नोंद झाली असून एकूण ३ लाख १२ हजार ५७६ एवढे मतदार आहेत, त्यापैकी ८० पेक्षा जास्त वयोगटातील तब्बल ११ हजार ६७६ (३.७४ टक्के) तर शारीरिक
विकलांग २ हजार ८८९ (०.९२ टक्के) आहे. त्यांना आता या सुविधेद्वारे घरातून मतदान करता येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच ८५ पेक्षा जास्त वयोगटातील आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक विकलांग नागरिकांसाठी घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी निवडणूक घोषित झाल्यानंतर ५ दिवसाच्या आत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे '१२डी' क्रमांकाचा अर्ज सादर करावा.
जिल्हाधिकारी निर्णय घेणार मतदानासाठी यावर अंतिम असून प्रत्यक्ष तात्पुरत्या मतदान केंद्राची उभारणी संबंधितांच्या घरी करणार आहे.
मतदानाचे चित्रीकरण केले जाणार आहे. यातून या सुविधेची पारदर्शकता जपली जाणार आहे, असे गायकवाड यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार सचिन जैस्वाल, नायब तहसीलदार सातव, प्रसार व प्रचार समितीचे नोडल सहाय्यक प्रकाश शिंदे, कोतवाल राजेंद्र खरात उपस्थित होते. दरम्यान, घरातून मतदान करताना राजकीय पक्ष आणि निवडणुकीतील उमेदवारांचे प्रतिनिधी, निवडणूक अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित असतील.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा