उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार, केंद्र सरकारवर टिकेची झोड
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली ः गुरूवारी येथील शिवलिला पँलेस हॉटेलमध्ये महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या पदाधिकार्यांची जिल्हास्तरीय संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत सर्वच पदाधिकार्यांनी महाविकास आघाडीकडून जो कोणी उमेदवार येईल त्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार केला. सर्वांनी मोदी सरकार हद्दपार करण्याचे आवाहन करीत महविकास आघाडी एकसंघ असल्याचे दाखवून दिले. यावेळी प्रमुख नेत्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावरून कडाडून हल्ला चढविला.
महाविकास आघाडीच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या सुचनेनुसार गुरूवारी हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व आम आदमी पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांची संयुक्त बैठक पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकीत ताकदीने व मतभेद विसरून निवडणुकांना सामेारे जाण्याचा निर्धार करण्यात आला. महाविकास आघाडीकडून ठाकरे गट, काँगे्रस व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली जात आहे. परंतू महाविकास आघाडीकडून ज्या उमेदवारांना उमेदवारी मिळेल त्यांना निवडुन आणण्याचा निश्चय करण्यात आला. ही अस्तित्वाची निवडणुक असून निमंत्रणाची वाट न पाहता महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे ठरले. यावेळी माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा, विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव, माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर, विनायक भिसे दिलीप देसाई, दिलीप चव्हाण, गोपू पाटील सावंत, संदेश देशमुख,राजेश पाटील मुनीर पटेल गोपाल ढोने यांनी मार्गदर्शन केले.
सर्वच वर्क्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावरून सडकून टिका केली. महागाई, बेरोजगारी, शेतीमालाचे कोसळलेले दर यावर बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. महाविकास आघाडीच्या बैठकीस चारही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी अनिल पतगे मनिष आखरे उध्दवराव संजय दराडे गायकवाड निहाल भैया जे की कुरेशी सुधिर सराफ भारूक जवळा बाजार शकील भाई अमिर आल्ली अनिल नैनवाणी बाळा साहेब मगर विलास गोरे राजकुमार देशमुख उमेश देशमुख इश्वर उरेवार माधव कोरडे बंडु मुटकुळे वसिम देशमुख गणेश शिदे खाडेकर सतोष देवकर जगनाथ देशमुख सोडु पाटील मधुकर जामठीकर परमेश्वर माडगे आनदराव जगताप अँड रवि शिदे मदन शिदेभागवत चव्हाण गजानन ढाकरे पंगज यादव सतोष राजेगोरे वनिता गुजकर निहाल कुरेशी किरन वाघमारे सखाराम उबाळे विठ्ठल शिदे भानुदास जाधव मारोतराव खाडेकर बापुराव पाटील भास्कर बेगाळ चद्रकात हराळ शेख नईम भैया देशमुख राजाराम खराटे मामुद भाई बन्टी नागरे महेश थोरात शिवाजी शिदे डॉ वंसतराव पतगे बाबाभाई उमेश मेटकर या सह आसख्य महाविकासआघाडीचे कार्यक्रर्ते उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा