नगरसेवक कैलास मेहेरेंसह शेतकऱ्यांचा इशारा.
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी आरिफ शेख
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँकखात्यात खरीप आणि रब्बी हंगामातील पीकविम्याची रक्कम येत्या आठ दिवसात जमा करा; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेवक कैलास मेहेत्रे यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला आहे.
याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. राज्यात सतत कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी मेटाकुटीस आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण
मिळावे म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या खरीप आणि हिस्स्यासह शासनाने प्रधानमंत्री पिकविमा योजना सुरू केली आहे. पीकविमा मिळण्याच्या निकषातील जटील अटींमुळे राज्यातील बरेचशे शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. नैसर्गिक आपत्तीत ७२ तासांच्या आत ऑनलाइन तक्रार करणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. विविध कारणे त्यामागे आहेत. बहुतांश शेतकऱ्यांजवळ अॅण्ड्राइड मोबाइल नसतात, तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना इंग्रजीमध्ये नोंदणी करता येत नाही. बरेचशे शेतकरी ऑनलाइन तक्रार दाखल करू शकले नाही, तर असंख्य शेतकऱ्यांकडून
तक्रार करतेवेळेस तांत्रिक चुका झाल्या. त्यामुळे हे शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मिळावा, अशी मागणी नगरसेवक कैलास मेहेत्रे यांच्यासह कौतिक ठाकरे, गजानन मेहेत्रे, संजय झोरे, जगन मेहेत्रे, बबन गव्हाड, किसन पवार यांनी केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा