या कार्यक्रमात मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
औंढा नागनाथ - तालुक्यातील जलालदाभा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये स्विप कार्यक्रमांतर्गत शनिवारी सकाळी ११ वाजता मतदार जनजागृतीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमासअ प्रमुख मार्गदर्शक गटशिक्षणाधिकारी तानाजी भोसले हे होते. या कार्यक्रमास औंढा नागनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी मोरे, मुख्याध्यापक प्रल्हाद सावळे, पत्रकार दत्तात्रय शेगुकर होते
यावेळी गटशिक्षणाधिकारी तानाजी भोसले यांनी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी अधिकाधिक युवा मतदारांनी मतदान करावे. आपल्या परिसरातील सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, मतदान प्रक्रीयेमध्ये अधिकाधिक युवकांना सहभागी करुन मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्याच्या दृष्टीने विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे.मतदानाच्या दिवशी सुट्टी म्हणून बाहेर फिरायला न जाता, घरी न थांबता मतदान करावे.
यावेळी बालाजी ठोंबरे, ग्योनोजी इंगळे , नृसिंह बोंदरवाड, सुनीता घोंगडे ,शीला पाटील ,शिवकांता मद्देवाड, भगवान रिठ्ठे, संतोष लोणकर यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी, गावातील ज्येष्ठ नागरिक ,युवक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन बालाजी ठोंबरे व आभार संतोष लोणकर यांनी मानले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा