संपूर्ण काम. सिलकोट ने रेती मात्र झाली गायब
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी ,शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकाम इमारतीसाठी 51 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर कॉन्ट्रॅक्ट जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत नक्षत्र कंट्रक्शन नांदेड यांना देण्यात आले होते. सदर नक्षत्र कंट्रक्शन ने हे काम बरबडा येथील सर्जे गुरुजी या गुत्तेदारांना खाजगी तत्त्वावर दिले त्यामुळे सदर गुत्तेदारांनी कामांमध्ये अनियमता असून त्यांनी सदर इस्टिमेट प्रमाणे काम न करता इस्टिमेटला बाजूला सारून दवाखान्याच्या पायाभरणीपासूनच शीलकोट व बुकटी युक्त असलेल्या सुरीचा वापर करून सिमेंट अल्प प्रमाणात वापरून काम पूर्ण करत आहे.
याकडे वरिष्ठ अधिकारी व सार्वजनिक जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे जेई गोणेवार , अभियंता होनराव व डीपी इंजिनियर देगलूर यांचीही दुर्लक्ष होत आहे
याकडे सर्वांचे दुर्लक्ष केले जात आहे.सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असताना अभियंता देगलूर हे मात्र गप्प का असा सवाल नागरिक करत आहे . 51 लाख रुपयाचा निधी देऊनही निकृष्ट दर्जाची कामे करत असल्याने लाखो रुपयांच्या निधी हडप करण्यासाठी गुत्तेदार व टक्केवारीचे गुत्तेदार तसेच अभियंता या सर्व एकत्र मिळून निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. सदर 51 लाखाचे ईमारत बांधकाम कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी कुंटुर येथील नागरिकांनी केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा