किरण सांगळे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेला राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
शिवशाही वृत्तसेवा,हिंगोली,जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
औंढा नागनाथ - औंढा नागनाथ तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या पार्डी सावळी या छोटयाशा खेडेगावातील किरण सांगळे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेला राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन करून उपशिक्षणाधिकारी प्रशासन शाखा वर्ग दोन हे पद मिळविले आहे. त्याबद्दल औंढा नागनाथ पंचायत समिती मधील शिक्षण विभागाच्या वतीने नूतन उपशिक्षणाधिकारी किरण सांगळे यांच्या शनिवारी सत्कार करण्यात आला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी तानाजी भोसले यांनी नूतन उपशिक्षणाधिकारी किरण सांगळे हिचा शाल श्रीफळ व पुस्तक देऊन सत्कार केला . यावेळी उपशिक्षणाधिकारी किरण सांगळे हिने पुस्तका संगे मैत्री करून पुस्तकाचे भरपूर वाचन करा. स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घ्या. एखाद्या वेळी अपयश आले तरीही खचून न जाता सतत जिद्द चिकाटी आणि मेहनतीने अभ्यास करा. यामुळे नक्कीच एक वेळेस यश आपल्याला मिळेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास भरपूर करावा व आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला आहे.
गटशिक्षणाधिकारी तानाजी भोसले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व नूतन उपशिक्षणाधिकारी किरण सांगळे यांचे यावेळी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी के. के. गोरे, केंद्रप्रमुख गंगाधर साखरे , नागोराव गडदे, एस.जायभाये , प्रा.रमेश वाव्हुळे , शिवाजी मोरे , किरण राठोड , मनोज कांबळे, दत्ता सूर्यवंशी, शिवाजी टोंपे, यांच्यासह केंद्रप्रमुख , शिक्षक व शिक्षण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा