वीस दिवसात १ कोटी १४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
भीमा नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांवर दगडफेक करून पंढरपूर तहसीलदारांची गाडी फोडल्याप्रकरणी तसेच शस्त्रांचा धाक दाखवत अवैध वाळू तस्करी करण्यासाठी वापरलेली वाहने घेऊन फरारी झाल्या प्रकरणी मंडल अधिकारी यांच्या फिर्यादीवरून अकरा वाळू तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधील सर्व आरोपी फरारी होते.
याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलिसांनी मोडनिंब रेल्वे स्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या तीन आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली होती.
या तपासा दरम्यान पोलिसांना जेसीबी, टिप्पर, चार मोटारसायकली असा ४२ लाखांचा मुद्देमाल आढळून आला आहे. यातील आणखी काही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपाधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, पोलीस अधिकारी विश्वास पाटील, वडणे, हेडकॉन्स्टेबल क्षिरसागर, तोंडले, नलावडे, मोरे, वाडदेकर, माळी, शेख, जगताप यांच्या पथकाने केली आहे.
अवैद्य वाळू उपसा प्रकरणी वीस दिवसात १ कोटी १४ लाखाचा
मुद्देमाल हस्तगत.पंढरपूर तालुक्यात शेगाव दुमाला, गोपाळपूर, गुरसाळे,
भोसेचिंचोले, एखलासपूर अशा विविध ठिकाणी अवैध वाळू उपसा करणाऱ्या
वाळू तस्करांवर कारवाई करत वीस दिवसात १ कोटी १४ लाखांचा मुद्देमाल
पंढरपूर तालुका पोलिसांनी हस्तगत करत १७ वाहने ताब्यात घेतली आहेत.
यामध्ये जेसीबी, टिपर, ट्रॅक्टरचा समावेश असून १४ आरोपी अटक करण्यात
आले आहे.सदरची कारवाई शेगाव दुमाला, गोपाळपूर, चिंचोली भोसे,
एकलासपूर येथे करण्यात आली असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे
पोलीस निरीक्षक मुजावर यांनी दिली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा