प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील व तपोनिधी शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
ॲग्रोन्यूज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, फलटण यांच्यावतीने फलटण येथे सातवे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. फलटण हे छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ असून मामाच्या गावी भाच्याच्या नावाने हे संमेलन होत आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे हे सातवे वर्ष असून छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्रातील एकमेव साहित्य संमेलन आहे.
परमपूज्य तपोनिधी शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. प्रा.नितीन बानगुडे पाटील यांच्या शुभहस्ते साहित्य सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले, यावेळी संमेलनाचे अध्यक्ष युवा कवी अविनाश चव्हाण, ज्येष्ठ लेखक जगन्नाथ शिंदे, ग्रामीण कथाकार रवींद्र कोकरे, ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश सस्ते, संयोजक प्रा. विजय काकडे, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या वर्षातील दर्जेदार साहित्यकृतींना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये प्रसिद्ध गझलकार साहित्यिक सुजित कुमार कांबळे यांच्या यशबळी या एकांकिका संग्रहाला, 'साहित्य सेवा पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गार्डे, सुलभा सस्ते यांनी केले.
गझल कविता कथा ललित कादंबरी अशा साहित्याच्या सर्वच प्रांतात त्यांचा मुक्त वावर आहे यापूर्वी त्यांचा टोळकं हा कथासंग्रह प्रकाशित झाला असून त्याला परिमल सांस्कृतिक व्यासपीठाचा कथा परिमल हा मानाचा पुरस्कार देखील मिळाला आहे.
छत्रपती संभाजी महाराज साहित्य सेवा पुरस्कार मिळालेला यशबळी हा एकांकिका संग्रह निषाद प्रकाशन यांनी प्रकाशित केला असून या पुस्तकात, यशबळी रूपगर्विता आणि कवितेची प्रेरणा अशा तीन एकांकिका आहेत.
सुजित कुमार कांबळे यांच्या यशबळी या एकांकिका संग्रहाला छत्रपती संभाजी महाराज साहित्य सेवा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे वाखरी आश्रम शाळा, निषाद प्रकाशन, साहित्यिक मित्रपरिवार, तसेच पंढरपूर व मंगळवेढा परिसरातून त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा