maharashtra day, workers day, shivshahi news,

आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ,

मिरवणुकीत युवकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल
MLA Sanjay Gaikwad , The video of youths being beaten up in the procession went viral , buldhana , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे
दोन दिवसांपूर्वी त्यांच्यावर महिलेला धमकावून जमिन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.आपल्या बेधडक आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यावर महिलेला धमकावून जमिन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
अशातच आता आमदार संजय गायकवाड यांनी शिवजयंतीच्या मिरवणुकीत युवकांना मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये आमदार संजय गायकवाड हे युवकांना मारत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, बुलढाणा शहरातील ही घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. या मिरवणुकीत आमदार संजय गायकवाड यांनी बॉडीगार्डची काठी घेऊन युवकांना बेदम मारहाण केल्याचे दिसत आहे. विशेष, बाब म्हणजे आमदार संजय गायकवाड मारहाण करत असताना पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच आमदार संजय गायकवाड यांच्यावर जमिन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर येथील रीटा उपाध्याय यांनी राजूर येथील दीड एकर शेतजमीन बळकावल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांच्यावर आहे. या प्रकरणात आमदार संजय गायकवाड यांच्यासह त्यांचे पुत्र मृत्यूंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी वाघाच्या शिकार संदर्भात केलेल्या विधानावरून आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !