उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांची माहिती
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी आरिफ शेख
मागील निवडणुकीत जवळपास ६४ टक्के मतदान झाले होते, आता उन्हाळा असल्याने मतदार घराबाहेर निघणे आवश्यक असून त्या दृष्टीने मताची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक विभाग जिंगल्स, पथनाट्य आणि विविध प्रकारे जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी दिली.
लोकसभा निवडणूक मतदानाच्या पाश्वंभूमीवर सिंदखेडराजा येथील निवडणूक विभागामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तहसिलदार सचिन जैस्वाल, गटविकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण वेणीकर, देऊळगाव राजा गटविकास अधिकारी मुकेश माहोर, ठाणेदार ब्रह्मानंद शेळके, देऊळगाव राजा ठाणेदार हेमंत शिंदे, नायब तहसीलदार मनोज सातव देऊळगाव राजा, चिखली, लोणार या मतदारसंघातील लोकसभेसाठी ४ लाख २५ हजार ९५७ मतदार आहेत. मतदार यादीनुसार सर्विस चोटरची संख्या ८५ वय वर्ष पुढील ६ हजार १९७ असून अपंग वोटरची संख्या २ हजार, ९१४ आहे तर सैनिक मतवार १०६३ आहेत. सर्विस सेंटरच्या मतदारांना घरी मतदान करण्याची सुविधा असून त्यासाठी निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. सैनिक मतदानासाठी इटीपीपीएसद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध केली आहे.
तर कर्मचाऱ्यांना देखील आधुनिक पद्धतीने इंडोसी मार्फत मतदानाची सुविधा आहे. तरीसुद्धा ज्यांना पोस्टल करायचे आहे, ते पोस्टल देखील करू शकतात, मतदान मतदान असेही उपविभागीय अधिकारी प्रा. खडसे
यांनी सांगितले, निवडणुकीसाठी मतदानाचे साहित्य येणे सुरू आहे. सिंदखेडराजा मतदारसंघात ३३६ मतदान केंद्र असून त्यासाठी १६८० कर्मचारी तैनात केले आहेत. विविध परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना राबवत असून तेथून सर्व परवानगी देण्यात येणार आहेत. प्रचारासाठी भोंगे वाजवण्याची वेळ सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी यावेळी दिली.
ओ.आर.एस मेडिकल किट आणि डॉक्टर पथक उपलब्ध असणार
उन्हाचा कडक पाहरा असल्यामुळे मतदान केंद्रावर मेडिकल कीट असणार आहे. त्यासाठी त्या किटमध्ये ओआरएस पावडर देखील देणार येणार असून गरज पडल्यास डॉक्टरची सेवा सुद्धा उपलब्ध राहणार आहे. स्तनदा मातांसाठी स्वतंत्र खोली राहणार असून दिव्यांगांना मतदान करण्यासाठी व्हील चेअर प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा