दोन महीला अधिकाऱ्याच्या कारवाई मुळे रेती तस्करीला ब्रेक
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी आरिफ शेख
सिंदखेडराजा तालुक्यात अवैध रेती उत्खननाला आळा बसावा यासाठी सिंदखेड राजा चे उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने जोरदार मोहीम राबवले सुरू केले आहे त्याचाच एक भाग म्हणून देऊळगाव राजा तालुक्यातील सुलतानपूर येथे चार पॉइंट वरील लोखंडी सेक्शन पाईप्स, रबरी पाईप्स, लोखंडी ड्रम/बैरेल, साचे अश्या प्रकारचे अवैध रेती उत्खनना करिता वापरण्यात येणारे साहित्य नष्ट करण्यात आले तहसीलदार वैशाली डोंगरजाळ महसूल ना तहसिलदार डॉ अस्मा मुजावर या दोन महिला अधिकाऱ्यांच्या धाडसी कारवाई मुळे अवैध रेती तस्करीला ब्रेक लागत आहे.
तहसीलदार वैशाली डोंगरजाळ आणि नायब तहसीलदार डॉ आसमा मुजावर या दोन महिला अधिकाऱ्यांनी दि 27 ला सकाळी 11.30 पासून सायं 6.45 पर्यंत मोहीम राबवून जेसीबी च्या साह्याने अवैध रेती उत्खननासाठी वापरलेले साहित्य नष्ट केले या महसूल विभागाच्या धाडसी कारवायामुळे अवैध रेती माफिया मध्ये खळबळ उडाली आहे या वेळी कोतवाल व वाहन चालक हजर होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा