सहा महिन्यापासून विहिरीत चार इंच सेवाळ साचले ग्रामसेवक व सरपंचाचे दुर्लक्ष
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी, शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वार्ड नंबर 5 मधील बंजारा समाजाची वस्ती असलेल्या कुंटूर तांडा येथे गेल्या सहा महिन्यापासून पाणीपुरवठा करणाऱ्या गावापासून 500 मीटर असलेल्याऔर आज विहिरीमध्ये चार इंच शेवाळ्याचा थर सासला असून त्या शेवाळावर हिरवे गवत फुटल्याचे चित्र स्पष्ट वरील छायाचित्र दिसत आहे .
या चार दिवसाखाली विहिरीची मोटर जळाल्याने गावातील नागरिकांनी विहिरीवर जाऊन सदर माहिती घेतली व या अगोदरही ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना वेळोवेळी माहिती दिली मात्र त्या विहिरीतून शेवाळ काढले नाही. व त्याच शेवाळ युक्त पाण्याचा वापर तांडा येथील बाराशे नागरिकांच्या घरांना पुरवठा केला जात होता असे बंजारा समाजातील नागरिकांनी सांगितले .
कुंटूर पासून दोन किमीवर वर असलेल्या बंजारा समाज वॉर्ड नंबर 5 असे मधील बंजारा समाजातील मोठ्या प्रमाणात वस्ती असणारे लोक राहतात येथे नाली बांधकाम असो सी सी रस्त्याचे काम, पाणी पुरवठा योजना, तांडा सुधार योजना, किंवा विविध योजनेची माहिती वेळेवर मिळत नसल्याची तक्रारही बंजारा समाजाचे काही नागरिकांनी बोलून दाखवली .
अनेक महिन्यापासून पाणीपुरवठ्याच्या विहिरीमध्ये शेवाळ साचत आहे . दुरुस्ती करा असे वेळोवेळी ग्रामपंचायतला सांगितले तरीही कोणी लक्ष दिले नाही .काही दिवसांनी मोटर खराब झाली तेव्हा काही लोक पाहण्यासाठी गेले असता सदर फोटो काढून सर्व माहिती ग्रामसेवक व सरपंच यांना टाकली त्यांनी यावर उपाययोजना लवकर करावी अशी मागणी ही नागरिकांनी केली असून गावामध्ये अशुद्ध पाणी पुरवठा कित्येक महिन्यापासून आहे.
शुद्ध पाणीपुरवठ्याची फिल्टर बंदच असून ते सुरुवातही करण्यात आली नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.
1) कुंटूर तांडा येथील नागरिकांवर वेळोवेळी अन्याय होत असून त्यांचे म्हणणेही कोणी ऐकून घेत नाही त्यामुळे पाणीपुरवठा असो या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे . कुंटूर तांडापासून कुंटूर हे दोन किलोमीटर असून ग्रामपंचायत कुटुर येथे .त्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला गाडी व ऑटो कोणतेही साधन नसल्याने नागरिकांना अनेक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे कुंटूर तांडा येथे ग्रामसेवकांनी येऊन तारीख देऊन त्यादिवशी नागरिकांचे कामे करावी अशी मत ग्रामपंचायत सदस्य बालाजी पवार यांनी व्यक्त केले असून आम्हास वेळोवेळी सर्व गोष्टीचा त्रास होत असून कामही वेळेवर होत नाही. त्यामुळे कुंटूर तांडा येथे बाराशे लोकसंख्या असणाऱ्या या वस्तीत व वार्ड नंबर पाच हे सर्व गोष्टी हे इथेच मिळाव्यात त्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न कराव्यात अन्यथा आम्हास वेगळी ग्रामपंचायत मागणीचे प्रस्ताव वरिष्ठाकडे सादर करावा लागणार असल्याचे त्यांच्याकडून ग्रामपंचायत सदस्य यांनी बोलताना सांगितले.- बालाजी पवार ग्रामपंचायत सदस्य कुंटुर तांडा,
2) कुंटूर तांडा येथील पाणीपुरवठ्याचे विहिरीतील मोटर जळाली असे नागरिकांनी सांगितल्यामुळे आम्ही तिथली मोटर काढून दुरुस्तीसाठी देणार आहोत असे सांगितले व त्या सदर विहिरीत सेवाळ युक्त पाणी असून सदर ही दुरुस्ती करून सदर साफ सफाई करून पाणीपुरवठ्यास दुसरी उपायोजना करणार आहोत व गावात एक ग्रामपंचायतचा बोर असून सदर पाणी हे ग्रामपंचायतला देणार आहोत .
कुंटुर येथे ग्रामपंचायत आहे . येथे असल्यामुळे मी तिथेच बसतो त्यामुळे नागरिकांनी येऊन आपले काम व प्रमाणपत्र वेळेवर घेऊन जातात काही नागरिक म्हणत असतील तर तसे काही नाही त्याच्यात काही तथे नाही नागरिकांचे वेळेवर कामे होतात , तांडा सुधार वस्ती योजना अंतर्गत लाखो रुपयांचा निधी आला तर त्याच्यातून कामे करत आहोत. ग्रामविकास अधिकारी नागेश्वर येडसनवार कुंटूर यांनी सांगितले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा