उमेदवारी जाहीर होताच महात्मा गांधी चौकात शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष केला.
शिवशाही वृत्तसेवा हींगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली - हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी जाहीर होताच हिंगोली येथील महात्मा गांधी चौकात शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष केला.
यावेळी शिवसेना हिंगोली उपजिल्हासंघटक शंकर घुगे, नांदापुर सर्कलप्रमुख गणेश जाधव, बासंबा सर्कलप्रमुख बालाजी जगताप, ज्ञानेश्वर जगताप , शिवसेना शहर संघटक चंदुअप्पा उबाळे, विलासराव जगताप, बद्रीनाथ जगताप, विनोद जगताप, हरी हरण, राजु पाटील, विशाल मारकड, अजय चंदणशिव, योगेश घुगे, सोपान पवार, भिवाजी बिरंगने व जेष्ठ पदाधिकार्यांसह शिवसैनिक उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा