आरोपींमध्ये ४० जणांचा समावेश
शिवशाही वृत्तसेवा,सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी , आरिफ शेख
अवैध रेती तस्करांचा मुजोरपणा जिल्ह्यात चांगलाच वाढला आहे. शासन व प्रशासनास न जुमानणाऱ्या या माफियांची आता शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ले करण्याइतपत मजल गेल्याचा प्रत्यय २६ मार्चच्या रात्री निमगाव वायाळ येथील नदीपात्रात , चार ट्रॅक्टरच्या माध्यमातून रेती तस्करी करणाऱ्या अंदाजे ४० माफियांनी महसुलचे कर्मचारी यशवंत परजाळे व विष्णु थोरात यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्याची वाटचाल 'बिहार' कडे तर होत नाही ना?, अशी भिती आता वाटायला लागली आहे.
काठ्माफियांची दादागिरी आणि त्यांचा खुलेआम सुरू असलेला धूमाकूळ ही
समस्या दिवसेंदीवस वाढतच चालली आहे. नयीछत्रातून सर्वोच्या वेळी बाजूची चोरी करणाचा उद्योग हा इतका साकोटीला गेला आहे की, त्यामधूनया कारवाईसाठी गेलेल्या अनेक अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचे धाडससुद्धा रेती माफियांच्या अंगी आलेले आहे. पूर्णा नदीसह अनेका नदीपात्रातून वाळूमाफियांनी पोखरून बेकायदा वाळूऊपसा चालविला आहे. वाळूउपसा करण्यास कायद्याने बंदी असली तरी दिवसाढवळया शेकडो टिप्पर व ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाळूची तस्करी सुरु असून माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे या माफियागिरीमधून प्राणघातक हल्याच्या घटनाही वाढल्या आहेत.
दरम्यान, निमगाव वायाळ येथील नदीपात्रात रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती २६ मार्चच्या रात्री गस्तीवर असलेल्या महसूलच्या पथकाला मिळाली होती मिळालेल्या माहितीच्याअनुषंगाने पथकातील तलाठी यशवंत घरजाळे आणि विष्णू थोरात तात्काळ निमगाव वायाळ येथील नदीपात्रात गेले. त्यावेळी ४०-४५ मजुरांनी येऊन त्या ठिकाणी शिवीगाळ केली ट्रॅक्टर चालकाने यशवंत घरजाळे व विष्णू थोरात यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच ट्रॅक्टरचा पाठलाग केल्यास जिवाने मारण्याची धमकी दिली, मात्र, ग्रामस्थांनी वेळीच धाव घेतल्याने त्यांचे प्राण वाचले.
पटनेची माहिती मिळताच तहसीलदार सचिन जयस्वाल यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी एक ट्रॅक्टर पकडले. तरतीन ट्रॅक्टर फरार झाले. या प्रकरणी किनगाव राजा पोलिसात भादविचे कलम ३५३, ३०९, ५०६, १४३, १४७, १४९ सहकलम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७), ४८ (८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार विनोद नरवाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार रमेश गोरे करीत आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा