ज्येष्ठ नेते तोताराम कायंदे यांची मध्यस्थी
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा जिल्हा प्रतिनिधी आरिफ शेख
तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत गावागावात सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करावे, या मागणीसाठी भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य तथा माजी सरपंच साबेर पठाण यांनी साखरखेर्डा येथे उपोषण सुरू केले होते, याची दखल घेत ठाणेदारांनी अवैध धंदे बंद करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने साबेर पठाण यांच्या उपोषणाची पहिल्याच दिवशी यशस्वी सांगता झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार तोताराम कायदे यांनी या प्रकरणात यशस्वी मध्यस्थी केली होती.
साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या अवैध धंदे बंद करावे, यासाठी साखरखेर्डा येथे शुक्रवारी साबेर पठाण यांनी उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला माजी आमदार तोताराम कायंदे यांनी भेट देऊन ठाणेदारांशी चर्चा केली. उपोषणाला वाढती गर्दी बघता पोलिसांनी लगेच अवैध धंदे बंद जाहीर करत, ठाणेदारांनी तसे लेखी आश्वासन दिल्याने उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली. यावेळी जमादार निवृत्ती पोकळे, भाजपचे अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष शेख जावेद, माजी पंचायत समिती सदस्य रफिक प्यारे, उल्हास देशपांडे, तंटामुक्ती अध्यक्ष हानिफ बागवान, प्रभाकर ताठे माऊली मुंडे, अॅड. निशिकांतराजे जाधव, जालमसिंग ठाकूर आदी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा