१८ जिल्ह्यातून वारंगा तर्फ नांदापुरला मिळाला द्वितीय पुरस्कार
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
येत्या दोन वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात गटशेतीचा कार्यक्रम राबविणार आहे. या माध्यमातून शेकडो शेतकरी, उद्योजक घडवायचे आहेत, असे प्रतिपादन पानी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांनी केले. तर १८ जिल्ह्यातून
उन्नती शेतकरी वारंगा तर्फ नांदापुरला गटाला द्वितीय पुरस्कार मिळाला आहे.
फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२३’ पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे हे यावेळी प्रमुख पाहुणे होते. पानी फाउंडेशनच्या संस्थापिका किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, सीईओ रीना दत्ता, मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ तसेच प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ, बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज, अतुल कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, आदिनाथ कोठारे, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मंजिरी फडणीस इत्यादी मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. राज्यातील १८ जिल्ह्यांतील ३९ तालुक्यांमधील ३००० गटांनी या स्पर्धेत भाग घेतला. यातील २१ गटांची अंतिम फेरीची निवड करण्यात आले.
त्यातून कुंभारगाव ता. करमाळा जि. सोलापूर येथील कुंभारगाव ऍग्रो प्रोड्यूसर कंपनी यांना १५ लाख रुपयांचा प्रथम पुरस्कर देण्यात आला. घोडेगाव ता. खुलताबाद जि. छत्रपती संभाजीनगर येथील आई जिजाई महिला शेतकरी गट आणि वारंगा तर्फ नांदापुर ता. कळमनुरी जि. हिंगोली येथील उन्नती शेतकरी गट यांना दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार विभागून आला. सन्मानचिन्ह आणि रोख ५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शेरेवाडी ता. आटपाडी जिल्हा सांगली येथील प्रगती महिला शेतकरी गट आणि सौंदे ता. करमाळा जि. सोलापूर येथील रॉयल फार्मर शेती गट यांना तिसरा पुरस्कार विभागून देण्यात आला. २ लाख ५० हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा