रामपूरकरांनी केला सन्मान
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निदेशानुसार जिल्हा काँग्रेस कमिटीचे संघटनात्मक कामकाज पाहण्यासाठी मुख्य समन्वयकपदी नायगावाचे माजी आ.वसंतराव चव्हाणांची निवड केल्याने दिपक रामपूरकरांनी देगलूरच्या काँग्रेसच्या शिष्टमंडळा सह माजी आ.वसंतराव चव्हाणांचे नायगाव येथील जनसंपर्क कार्यालयात जोरदार स्वागत केले
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राजसभेचे खा.अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपासोबत घरोबा केल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात दुसरे दिगग्ज माजी वसंतराव चव्हाणांच्या हाती जिल्ह्याचे सुत्र देत त्यांची मुख्य समन्वयकपदी पदावर नियुक्ती केल्याने देगलूरचे भूमिपुत्र दिपक रामपूरकरांनी सर्व शिष्टमंडळा सह नायगाव येथील काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात लोकनेते माजी आ.वसंतराव चव्हाणांची भेट घेत मोठ्या उत्साहात त्यांचा सत्कार व सन्मान दिपक कांबळे यांनी केले तसेच आगामी लोकसभेचे नेतृत्व करावे अशा भावनाही दिपक रामपूरकरांनी व्यक्त केल्या.
यावेळी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते प्रा.रवींद्र चव्हाण,प्रवक्ते दिलीप पांढरे,रमेश शिवणीकर, प्रशांत पाटील मनूरकर, माणिक चव्हाण, किरण कदम दत्ता येवते, शिवराज वरवटे.नागेश गायकवाड,गजानन भोसले यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा