लिंगायत समाजाला खरा न्याय भाजपने दिला आशा भावना विकास पत्रकार विकास भुरे यांनी व्यक्त केल्या
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते ते राज्यसभेच्या खासदारकीचा डॉ.अजित गोपछेडे यांचा प्रवास हा निष्ठेचा असला तरी नांदेड जिल्ह्यातील बहुसंख्य असलेल्या लिंगायत समाजाला असे वाटत होते.जवळपास हिंदू विचार धारेसी एकसंघ असलेल्या लिंगायत समाजाचे राजकीय स्थान शुन्य आहे .परंतु भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने राज्यसभेची खासदारकी बहाल करून बहुसंख्य पण राजकीय अस्तित्व जेमतेम असलेल्या लिंगायत समाजाला खरा न्याय भाजपने दिल्याच्या भावना शिव कीर्तनकार तथा पत्रकार विकास भुरे या निमित्ताने भावना व्यक्त केल्या.
नांदेड लोकसभा मतदारसंघात जवळपास साडे नऊ लाख लोकसंख्या असलेल्या लिंगायत समाजातील दोघांना राजकीय नेतृत्व करण्याची संधी यापूर्वी मिळाली होती.तेही मतदारांच्या दरबारात माजी आमदार गंगाधर पटणे यांना जनता दल पक्षाने बिलोली मतदार संघात उमेदवारी दिली होती,तर कंधार मतदार संघात काॅग्रेस पक्षाने माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांना उमेदवारी दिली होती.परंतु मधल्या काळात बहुसंख्य समाज व मतदार असतानां कुठल्याही राजकीय पक्षाने एखाद्या मतदार संघात उमेदवारी देऊन संख्याबळाचा बहुमान राखला नाही. त्याला राजकीय परिस्थिती व नेतृत्व गुणांचा अभाव असू शकतो. बहुसंख्येने असलेल्या लिंगायत समाजाने हिंदुत्वाची कास सोडली नाही, शिवसेना असेल भाजपा असेल या पक्षाचा मतदार म्हणून अप्रत्यक्ष शिक्का मारलेला असयाचा.परंतु आपल्या मताचे मुल्यांकन भाजप सारख्या पक्षात होत नसल्याने इतर पक्षा कडे वळण्याच्या मनस्थितीत होता.खरे तर लिंगायत समाजाच्या उमेदवारांना एखाद्या मतदार संघात उभे करून निवडून आणता येईल का असा प्रयत्न होणे गरजेचे आहे. शक्यतो लिंगायत समाजातील कार्यकर्ता मोठा होऊन उद्याचा स्पर्धक होईल याची काळजी घेऊन राजकारण होत गेले.
यामुळे लिंगायत समाजाचे राजकीय अस्तित्व शुन्य होत गेले.परंतु सध्य परिस्थितीत भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते कुठल्याही जातीपातीच्या राजकारणा पासून अलीप्त असलेले उच्च शिक्षीत बिलोली तालुक्यातील कोल्हे बोरगाव येथील शेतकरी कुटुंबातील डॉ.अजित गोपछेडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळता मिळता राहिली होती.आपल्या समाजाला न्याय मिळणार नाही अश्या प्रतिक्रिया तेव्हा उमटल्या होत्या.परंतु भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने जवळपास साडे नऊ लाख लोकसंख्या व साडे चार लाख मतदार असलेल्या लिंगायत मतदानाचा बहुमान राखून राज्यसभेची खासदारकी बहाल केली.भाजपाच्या राजनितीने व्यक्ती एक, न्याय मात्र दोघांना असे गणित जुळविले नसेल ना असे वाटत आहे.एक निष्ठा आणि दुसरा आपला मतदार दोघांना न्याय देऊन दिलासा दिल्याच्या भावना बहुसंख्य लिंगायत समाजातून व्यक्त होत आहेत असी माहिती शिव कीर्तनकार विकास भुरे यांनी दिली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा