महसुलमंत्र्यांना दुष्काळनिवारणासाठी शरद पवळेंचे तातडीचे
शिवशाही वृत्तसेवा, बूलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुदाम दरेकर पारनेर
गाळपेरीच्या नावाखाली गाळ उपशाला विरोध करणाऱ्यांवर स्वक्तीची कारवाई करा. पवळे
चौकट भूगर्भातील पाण्याच्या खालावत चाललेल्या पातळीच्या संवर्धनासह दुष्काळ निवारणासाठी टँकरसह आदी व्यवस्थेमार्फत होणारा खर्च सरकारच्या तिजोरीवर मोठा भार निर्माण करणारा असून शासणाकडून होणारे "गाळमुक्त धरण गाळयुक्त धरण" अभियान कागदावरच राहताना दिसत आहे याची गावागावात जाहिरात होते परंतु अंमलबजावणी होत नसून गावा गावात अनेक पाझर तलाव,धरणे,बंधारे, ओढे नाले उन्हाळ्यात कोरडे पडत आहेत दरवर्षी उन्हाळ्यामध्ये दुष्काळ निवारणाची चर्चा होते परंतु प्रत्यक्ष पारदर्शक काम होत नाही त्यामुळे टँकरमुक्त संमृद्ध महाराष्ट्रासाठी गाळ उपसा सक्तीचा करून पुरातन जलस्त्रोतांना पुनर्जिवित करणे काळाची गरज~पवळे
महाराष्ट्रात उन्हाळा आणि दुष्काळ एक समीकरण पहाताना दिसत आहे दरवर्षी टँकर आणि चारा यावर सरकारचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत असुन सातत्याने उन्हाळयात पाणीटंचाई,पाणीप्रश्न यावर चर्चा होतेय परंतु मुबलक पाऊस होवूनही हा प्रश्न मिटत नाही उन्हाळ्यात जलसंवर्धनाच्या कामासाठी मोठी चर्चा होते प्रत्यक्ष गावागावात यावर काम त्यापटीत होत नाही महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये सर्रास टँकर चालूच राहतो अशा भागांना प्राधान्य देत शासणाने जलस्त्रोतांच्या निर्माणबरोबर पुरातन जलस्त्रोतांच्या दुरुस्त्यांसह गाळउपसा सक्तीचा करून गाळपेरीच्या नावाखाली हजारो हेक्टर पाण्यापासून वंचित राहणाऱ्या जमिनी ओलीताखाली आणण्यासाठी प्रत्यक्षदर्शी शासण प्रशासनाने परिस्थितीच गांभिर्य लक्षात घेत.
गाळ उपशाला विरोध करणाऱ्यांवर सक्तीची कारवाई करून भुगर्भातील जलसंवर्धन, समृद्ध शेतकरी, समृद्ध गाव , समृद्ध महाराष्ट्राच स्वप्न पूर्ण कराव तातडीने गावागावातील वाडीस्तीवरील पुरातन जरलस्त्रोतांची दुरुस्ती करत गाळ उपसा सक्तीचा करून ओढा, नदी नाले,यांचे खोलिकरण रुंदीकरण करून उन्हाळ्यात जलस्त्रोतांच्या जलसाठ्यातील जलसंचय स्थिती लक्षात घेत उपसा नियंत्रण करून दुष्काळावर योग्य मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे महमुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी उन्हाळयात तातडीने दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी पत्र पाठवल्याचे प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा