सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारीपदी प्रा. संजय खडसे रुजू
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
राष्ट्रमाता, राजमाता माँ जिजाऊसाहेब यांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रा. संजय खडसे यांनी येथील उपविभागीय अधिकारीपदाची सुत्रे हाती घेतली. आपल्या हातून उत्कृष्ट कार्य घडावे, प्रशासकीय कामकाज गतिमान होण्याकरिता जिजाऊंच्या आशीर्वादाने काम करण्याची ऊर्जा मिळावी, याकरिता प्रा. खडसे आधी माँ जिजाऊंच्या जन्मस्थळी पोहोचले. कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. यापूर्वीही त्यांनी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी म्हणून जिल्ह्यात यशस्वी कामगिरी केली आहे.
मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील उपविभागीय अधिकारीपद रिक्त होते. परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड हे प्रभारी म्हणून कामकाज पाहात होते. मध्यंतरी या ठिकाणी यायला कुणी अधिकारी तयार नव्हता. आता प्रा. संजय खडसे यांच्या रुपाने कायमस्वरुपी उपविभागीय अधिकारी मिळाला आहे. एसडीओ म्हणून त्यांची येथे बदली झाली. १२ मार्च रोजी प्रा. संजय खडसे रुजू होण्यासाठी आले. त्यांनी आधी महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळी भेट दिली. माँ जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन ते एसडीओ कार्यालयात पोहोचले. याठिकाणी सर्व महापुरुषांना वंदन करून त्यांनी पदभार स्वीकारला.
प्रा. खडसे हे आठवे उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात दारव्हा येथून प्रा. संजय खडसे यांची येथे बदली झाली. लोकाभिमुख व पारदर्शक कारभाराला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे संजय खडसे यांनी बुलढाणा जिल्ह्यात पाच वर्षे सेवा दिली आहे. त्यांना उत्कृष्ट उपविभागीय अधिकारी म्हणून गौरविण्यात
अकरा वर्षांत आठ एसडीओ
सिंदखेड राजात १५ ऑगस्ट २०१३ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयाची स्थापना झाली. सर्वात आधी डॉ. विवेक घोडके यांनी कामकाज पाहिले. त्यानंतर डॉ. सचिन खल्याळ, नम्रता चाटे, सुभाष दळवी, भूषण अहिरे व संजयकुमार ढवळे (केवळ तीन दिवस) यांनी एसडीओपदी काम केले. सद्यस्थितीत समाधान गायकवाड यांच्याकडे प्रभार होता.
अंगी उत्कृष्ट कलाप्रा. खडसे हे एक उत्तम कलाकारही आहेत. त्यांनी चित्रपटातदेखील भूमिका साकारली आहे. महापुरुषांना समर्पित अनेक गाणे गायिली आहेत. शासनाच्या योजना त्यांनी आपल्या गीत आणि अभिनयातून शहरापासून गाव, वस्तीपर्यंत पोहोचविल्या आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा