महिला दिन साजरा
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर जिल्हा प्रतिनिधी सुदाम दरेकर पारनेर
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ठ महिला पत्रकार पुरस्कार सौ . निलम सुरेश खोसे पाटील यांना महिला दिनाचे औचित्य साधून शिर्डी येथे सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते व आदर्श गाव हिवरेबाजार चे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार , राज्य संघाचे प्रदेश सचिव डॉ . विश्वासराव आरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच सन्मान पुर्वक देण्यात आला .
पत्रकारिता क्षेत्रात खऱ्या अर्थाने पुरुष पत्रकार मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत , म्हणून महिला दिनाचे औचित्य साधून दैनिक पारनेर समर्थ च्या मुख्य वार्ताहर , दैनिक बाळकडू व एस ९ न्युज , मिडिया , चॅनल च्या पारनेर तालुका प्रतिनिधी मुळ पाडळी दर्याच्या व निघोज मधील स्थायिक झालेल्या पत्रकार सौ निलम सुरेश खोसे पाटील यांचा प्रशस्तीपत्र , शाल , पुष्पगुच्छ व भेट वस्तू देवून गौरविण्यात आले . यावेळी महंत रामगिरी महाराज व पद्मश्री पोपटराव पवार यांनी त्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या .
सौ . निलम खोसे पाटील या राज्य मराठी पत्रकार संघाचा हा मानाचा सन्मान स्विकारताना भारावून गेल्या . पुरस्कारा विषयी त्या म्हणाल्या की , राज्याचे सचिव डॉ . विश्वासराव आरोटे सर व इतरांनी माझ्या सारख्या एका सामान्य घरातील व पारनेर तालुक्यातून एकमेव महिला पत्रकाराची या पुरस्कारा साठी निवड केली , हे मी माझे भाग्यच समजते . या पुरस्काराने मला माझी लेखणी चालविताना व पत्रकारिता करताना जबाबदारी वाढली आहे .
मी प्रामाणिक पणे पत्रकारिता करणार असून पत्रकारितेला न्याय देण्याचे काम करीन व राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्य सर्वदूर पोहचविण्याचा प्रयत्न करीन , असे ही सौ .खोसे पाटील शेवटी म्हणाल्या .
यावेळी राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी , सदस्य व त्यांचे कुटूंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते . सेवानिवृत्त प्राचार्य हभप रामचंद्र महाराज सुपेकर सर यांच्या सुश्राव्य वाणीतून पसायदान झाले , तद्नंतर सग्रास भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा