कुटुंबासोबतच समाजातूनही होत आहे कौतुक
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर ( शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर येथील मुंतझिम मतीन शेख या चिमुकल्याने पवित्र रमजानचा पहिला रोज़ा पूर्ण केला आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुस्लीम बांधवांचे पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण करून पंढरपूर शहरातील रहिवासी मतीन शेख यांचे चिरंजीव मुंतझिम ( वय ६ ) याने पवित्र रमजानचा आपल्या जीवनातला पहिला रोजा (उपवास ) ठेवला. सध्याचे वाढलेले तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात सकाळी पाच वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत अन्नाच्या एक कण आणि पाणी न पिता उपाशी पोटी राहून यांनी ( अल्लाह ) ईश्वर प्रती आपली श्रद्धा व्यक्त केली एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल आजी,आजोबा,आई,वडील काका ,मामा व नातेवाईक बांधव यांनी अभिनंदन करून कौतुक केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा