पुण्याच्या भारतीय रुग्णालयात उपचार सुरू
शिवशाही वृत्तसेवा, पुणे (प्रतिनिधी अभिषेक जाधव)
पुणे दि १४ :- माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याच्या चर्चेत कोणतेही तथ्य नसून त्यांची तब्येत व्यवस्थित आहे. पुण्यातील भारती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून, त्यांना पुढील दोन ते तीन दिवसांत रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली.प्रतिभा पाटील यांची तब्येत बरी नसल्याने त्यांना भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज गुरुवारी सकाळपासून त्यांची प्रकृती खालावली असल्याची बातमी पसरली. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची चर्चा सुरू झाली.
परंतु, त्या उपचारांना योग्य प्रतिसाद देत असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. पुढील दोन दिवसांत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची अपेक्षा असून त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा