सरकारी कामात भाजपचा बोलबाला
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली - उद्योगासाठी लोकांना कर्ज मिळावे ,बँकेचे हेलपाटे कुठेतरी थांबावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंचित लोकांसाठी हा मेळावा जिल्ह्यातील महामंडळाकडून ठेवला होता मात्र या मेळाव्यात सरकारी कामापेक्षा विरोधी पक्षावर टीका टिपणी करीत अप्रत्यक्षपणे भाजपचा बोलबाला दिसत होता.
येथील कै.शिवाजीराव देशमुख सभागृहात वंचित, गरजवंत लोकांना बँकेकडून कर्ज मिळावे यासाठी जिल्ह्यातील महात्मा फुले आर्थिक मागास मंडळ, संत रोहिदास महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ यांच्या मार्फत मेळाव्याचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते . या मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुरदृश्य प्रणाली द्वारे मार्गार्शन केले. या मेळाव्याला केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी मला पाठविले असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , विविध मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक , माजी आमदार गजानन घुगे , माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर आदींची उपस्थिती होती.
एकीकडे सरकारी कार्यक्रम असताना या मेळाव्यात कर्जापासून वंचित लाभार्थ्यांना तातडीने बँकेकडून कर्ज मिळावे यासाठी हा मेळावा आयोजीत करण्यात आला होता. मात्र वंचित लाभार्थी पेक्षा याठिकाणी भाजप च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सभागृह गच्च भरले होते. यावेळी भाजप कार्यकर्ते मंत्री रावसाहेब दानवे सोबत फोटोग्राफी काढण्यात मग्न होते. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात येणार होती. मात्र पत्रकार परिषद न घेताच केवळ इलेक्ट्रॉनिक मिडिया समोर बोलून मंत्री बाहेर पडले.
मेळाव्यात बोलताना दानवे म्हणाले ,यापूर्वी वंचित लोकांना कर्ज घेण्यासाठी अर्ज भरण्यासाठी बँकेकडे दहा चकरा मारण्याची वेळ होती. मात्र आता पंतप्रधान मोदी हे गोरगरीब ,जनतेचा कैवारी मोदी असल्याचे भाजप कार्यकर्त्या कडून बोलून घेतले जात होते. आता तसे राहिले नसून ,वंचित ,गरजवंत लोकांना शेती ,व्यवसाय ,करण्याची इच्छा असेल तर त्यांना बोलवा कर्ज द्या असा पंतप्रधान गरिबांचे कल्याण करतो, गरजा पूर्ण करतो असा सवाल करीत मंत्री दानवे यांनी असा पंतप्रधान नको असे काही लोक म्हणतात त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीच्या नेत्यावर टीका केली.
दरम्यान, या सर्व महामंडळाने मार्च एन्ड असल्यामुळे या मेळाव्यात लाखो रुपयांची उधळपट्टी करीत मेळाव्याला इतर पक्षाचे नेते मंडळी काही दिसली नाही. महायुतीत केवळ भाजपचे पदाधिकारी ,कार्यकर्ते दिसून आले. हा मेळावा सरकारी होता की भाजपचा होता काही कळायला मार्ग नव्हता , जिल्हा व्यवस्थापक काची यांना दूरध्वनी केला असता त्यांचा फोन कव्हरेज क्षेत्राबाहेर होता.त्यामुळे त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. एकंदरीत सरकारी अधिकारी भाजपच्या दिमतीला हजेरी लावल्याचे दिसून आले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा