शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद वाढली
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
आखाडा बाळापूर - शेवाळा , आखाडा बाळापुर ता. कळमनुरी येथील शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात मंगळवारी प्रवेश केल्याने ठाकरे गटाची ताकद वाढली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र चे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना संपूर्ण भारत देशाला कोरोनाचे संकट आले होते या संकटात उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारे आपल्या जीवाची परवा न करता महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्रातील संपूर्ण गोरगरीब जनतेला कोरोना महामारीत सहकार्य केले. व तसेच शेतकऱ्यांची कर्ज माफी केली असे अनेक लोकहिताचे कामे त्यांनी केले. त्यांनी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे दृष्टिकोन ठेवून राज्याचा विकास केला. त्यांचे लोकहिताचे सर्व कामे हा समाज कधीही विसरणार नाही.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत
हिंगोली जिल्हाप्रमुख अजय ऊर्फ गोपु पाटील यांच्या हस्ते आ.बाळापुर येथील शेख अजहर, सय्यद सरवर, शेख मजहार, शेख रियाज, शेख वाजीद, शेख अफरोज, साकीब राज, भास्कर उदाळ, शेख सलमान, शेख जुबेर, शेख आदीब, शेख सलमान शेख युसूफ, शेख शाहरुख, शेख जमीर शेख बासित, सय्यद अखिल, शेख इसराईल, शेख रमीज,शेख रियाज, राहुल राऊत, शेख अय्याज, शेख मुजमील, शेख इर्शाद, प्रमोद इंगोले, शाकिर राज, शेख समीर, शेख आलम, शेख अरबाज, सय्यद बशीर, सय्यद अजीम, वसीम पठाण, शेख जावेद, शेख आसिफ, शेख अल्ताफ, शेख बबलू, लखन पंडित, सुरज मढे, मोहसीन पठाण, शेख सोहेल, फैयाज काजी, शेख जाकीर, शेख अझहर शेख दिलु, शेख समीर, शेख नावेद, शेख इम्रान, शेख इरफान, शेख अखिल, शेख अस्लम,शानु एस.के. यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.
aaaa
यावेळी विधानसभा प्रमुख चंद्रकांत देशमुख, उपजिल्हासंघटक सोपान पाटील, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अब्दुल्ला पठाण, गुड्डू गोयंका, अल्पसंख्याक उपजिल्हाप्रमुख गुफरान कुरेशी, ग्रा.प. सदस्य यशवंत पंडित, मोहम्मद जहीर, शेख सद्दाम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा