'हर हर महादेव'च्या गजरात औंढा शहर दणाणले
औंढा नागनाथ - हर हर महादेव, बम बम भोले, नागनाथ महाराज की जय'च्या जयघोषामध्ये सोमवार दिनांक ११ मार्च रोजी रात्री महाशिवरात्री यात्रेनिमित्त नागनाथ मंदिरामध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव साजरा झाला.
महाशिवरात्रीच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण असणारा रथोत्सव असल्याने दुपारपासूनच हजारो भाविकांची गदीं होती. फुलांच्या माला आणि दिव्यांद्वारे सजावट केलेल्या रथामध्ये श्री नागनाथांची उत्सवमूर्ती ठेवण्यात आली होती, रात्री दहाच्या सुमारास मंदिराभोवती रथाच्या प्रदक्षिणेला सुरवात झाली. अशा पाच प्रदक्षिणा झाल्या. यावेळी उपस्थित भाविकांनी 'हर हर महादेव, ओम नमः शिवाय, नागनाथ महाराज की जय, बम बम भोलेचा गजर केला.
उपविभागीय अधिकारी डाँ. सचिन खल्लाळ , देवस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे यांच्या हस्ते 'श्रीं'ची पूजा झाली.उपविभागीय अधिकारी डाँ. सचिन खल्लाळ ,अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, नगराध्यक्षा सपना कनकुटे , उपनगराध्यक्ष दिलीपकुमार राठोड यांच्यासह विश्वस्त अँड.शिवशंकर वाबळे, देवस्थानचे अधिक्षक वैजेनाथ पवार, सुरेद्र डफळ, मुख्यपुजारी तुळजादास भोपी , हरीहर भोपी , गार्डप्रमुख बबन सोनुने ,रामेश्वर गुरव, आदीसह जवळपास दोन लाखांहून अधिक भाविक उपस्थित होते.
दरम्यान, १९४८ मध्ये झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. यात गणपत ऋषी, शंकर पाठक, रंगनाथ सुरवाडकर, तसेच २०११ मध्ये सतीश पाठक यांचे रथ मिरवणुकीत अपघाती निधन झाले होते. त्यांनाही यावेळी आदरांजली अर्पण करण्यात आली.
भजनी मंडळ, बँड, ढोलपथक सहभागीरथोत्सवात भजनी मंडळ व बँडपथक सह सहभागी झाले होते.उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे, यांच्यासह पोलिस निरीक्षकराहीरे, सपोनि बालाजी महाजन ,पोलीस उपनिरीक्षक मिथुन सावंत ,पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे यांच्यासह पोलीस व होमगार्ड, क्युआरटी पथक,बिडीडीएस पथक, एसआरपिएफ बटालियन आदींचा चोख बंदोबस्त ठेवला होता.
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा