महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम प्रसिद्धीसाठी बातमीदारांना दिले जाणारे पुरस्कार
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या प्रसिद्धीसाठी बातमीदारांना पुरस्कार दिले जात होते परंतु सन 2017 -2018 व 2018 -2019 या दोन वर्षाचे प्रस्ताव पुरस्कार प्रलंबित असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
राज्याच्या गृह विभागामार्फत सन 2007 पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम ही योजना राबविण्यात आली होती. गाव पातळीवर सामाजिक सलोखा कायम राहावा व तंटे भांडण बंद व्हावे याकरिता तत्कालीन गृहमंत्री कै. आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवली होती. या योजनेला प्रसिद्धी देणाऱ्या पत्रकारांचाही दरवर्षी पुरस्कार देऊन गौरव केला जात होता. विभाग, राज्य व जिल्हा स्तरावर पत्रकारांना पुरस्कार दिले जात होते याअंतर्गत सन 2017 -2018 व 2018 -2019 या दोन वर्षाचे प्रस्ताव जिल्हा स्तरावर पत्रकाराकडून मागविले होते.
या दोन्ही वर्षीही पत्रकार सुधीर गोगटे यांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केले होते. शासनाने नियुक्ती केलेल्या समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावाची छाननी करून दोन्ही वर्षाचे प्रस्ताव विभागीय स्तरावर पाठविण्यात आले होते. अनेक वर्षे उलटले तरी देखील या पुरस्काराची घोषणा शासन स्तरावरून झाली नाही .विशेष म्हणजे हिंगोली जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील पत्रकारांच्या पुरस्काराची घोषणा शासनाकडून झाली नाही. यासंदर्भात सुधीर गोगटे यांनी 9 मे 2023 रोजी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री सचिवालय कक्ष तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत गृह विभागाचे सहसचिव अवर सचिव यांनाही निवेदन पाठविले होते
या संदर्भात पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांना निवेदन देण्यात आले असता त्यांनीही 14 एप्रिल 2023 व 19 जून 2023 अशा दोन ते तीन वेळा गृह विभागाकडे पाठपुरावा केला परंतु अद्याप पर्यंत निवेदनाची कोणतीही दखल शासन स्तरावरून घेण्यात आली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दहा मार्चला शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त हिंगोलीत आले असता पत्रकार सुधीर गोगटे यांनी त्यांची भेट घेऊन प्रलंबित पुरस्काराबाबत व्यथा मांडली यावेळी लवकरच यावर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले.
पत्रकारांच्या पुरस्काराला शासनाचा विसरराज्याची तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबविली जात आहे. या अभियानात पत्रकारांनाही पुरस्कार देण्याची निश्चित केले आहे. मात्र मागील दोन वर्षात शासनाकडून पत्रकारांच्या पुरस्काराकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. राजकारण्यांच्या अंतर्गत राजकारणाचा फटका पत्रकारांच्या पुरस्काराला बसू लागला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा