maharashtra day, workers day, shivshahi news,

चित्र पाहून नव्हे तर चरित्र वाचून संताच्या विचाराने वाटचाल करावी

शि.भ.प.श्रीदेवी स्वामी कापशीकर 
Shi.B.P.Sridevi Swami Kapshikar , nanded , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
संताच्या आणि महापुरुषाच्या विचारात खरी संजीवनी मिळते आपल्या जीवनाची वाटचाल यशस्वी होण्यासाठी संताचे व महापुरुषांचे चित्र पाहून नव्हे तर त्यांची अनमोल चरित्र वाचून त्यांच्या विचाराने जीवनाची वाटचाल करावी असे अमृतवाणी विचार शिवभक्त परायण शि.भ.प.सौ श्रीदेवी भीमाशंकर स्वामी कापशीकर यांनी आयोजित कीर्तन रुपी सेवेत व्यक्त केले.
  नायगाव तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समस्त गावकऱ्यांच्या वतीने सर्व धर्मीय अखंड शिवनाम सप्ताह चालू असून कीर्तनरुपी सेवेच्या पाचव्या दिवशी श्रीदेवी स्वामी कापशीकर आपल्या सेवेत म्हणाल्या की, जग हे उलटे चालले आहे, सध्या दानत्व लोप पावत आहे हाती दानत्व असावे तेव्हाच देव प्राप्ती होते असे ते सांगत पुढे म्हणाले की मायबाप मेल्यानंतर लाखाच्या पंगती वाढवून धनवान होण्याची लेबल लावून घेण्यापेक्षा जन्मदाते जिवंत असताना त्यांची सेवा करून गुणवान होण्याची लेवल लावून घ्यावे अशीही ते आवर्जून सांगितले. 
त्यांच्या कीर्तन रुपी सेवेमध्ये भोस्करताई, अमलापुरेताई, अनेरायेताई, वसमतेताई, यासह जनार्दन बेंद्रीकर, गणेश मुरुडकर, रामदास वसमत, मनमत पांडे, आत्माराम पाटील, शिवाजी कुंचेलीकर, प्रदीप चव्हाण, विजयकुमार द्रोणाचार्य, ज्ञानेश्वर स्वामी, ज्ञानेश्वर विभुते, शेखर अनेराये यांनी संगीताची साथ दिली तर यावेळी माजी सरपंच संजय पाटील आनेराये , माजी पोलीस पाटील उत्तमराव पांडे, विठ्ठल पाटील आणेराये ,श्याम पाटील चोंडे, सुरेश गुरव महाराज, मल्लिकार्जुन मठपती, माधव भाऊराव पाटील आणेराये ,बालाजी नारायण पाटील आणेराये ,शिवा पाटील आणेराये ,गंगाधर पाटील आणेराये ,विजय पाटील आणेराये ,वसंत आणेराये ,सुरेश आणेराये ,संभाजी किशनराव पाटील आणेराये,ज्ञानेश्वर पांडुरंग पाटील पांडे यासह महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
सदर कीर्तनामध्ये अमृतवाणी विचार, बासरीचा मंजूळ स्वर आणि टाळांचा खळखळाट याने शेळगाव छत्री परिसरात सर्वत्र भक्तिमय वातावरण पसरले होते. तर भाविक भक्त तलीन होऊन कीर्तनाचा आस्वाद घेतले आहेत.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !