टिप्पर गोदमगाव येथे पकडून कारवाईसाठी नायगाव पोलिस ठाण्यात लावला
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
लोहा तालुक्यातील अवैध उपसा केलेले रेती नायगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून रात्री-बेरात्री अवैध रेती वाहतूकीचा सपाटाच सुरू होता. नुकत्याच तहसीलदार म्हणून रुजू झालेल्या सौ.गायकवाड यांना मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री माजंरम मार्गे गस्त घालत असताना अवैध वाळू वाहतुक करणारा टिप्पर गोदमगाव येथे पकडून कारवाईसाठी नायगाव पोलिस ठाण्यात लावण्यात आले.
गेल्या कित्येक दिवसांपासून लोहा तालुक्यातील काही गावच्या हद्दीतील गोदावरी पात्रात दिवस रात्र बोट व तराफ्याच्या साह्याने बेसुमार वाळू उत्खनन होत आहे.या भागात काढलेली वाळू दहा ते पंधरा टिप्पर मध्ये भरून कोणालाही न भिता नायगाव तालुक्यात विक्रीसाठी येत आहे विशेष म्हणजे या टिप्पर धारकांनी सदर टिपरवरले नबंर पुसुन टाकले आहेत.
अवैध वाळू वाहतुक नायगाव तालुक्यात होत असल्याचे अनेकांनी नव्याने आलेल्या तहसीलदार सौ.धम्मप्रीया गायकवाड यांना सांगितले. माहीती मिळाल्यावरून तहसीलदार गायकवाड यांनी मंडळधिकारी कावळे ,व नरसीचे तलाटी बामणीकर यांना सोबत घेऊन मंगळवारी रात्री तालुक्यात गस्त घातले बुधवारी पहाटे चार वाजता गोदमगांव येथे वाळूने भरलेला टिप्पर क्र,एम.एच.२६ बी.ई.१६१४ आढळून आला सदर टिप्पर पकडून नायगाव पोलीस ठाण्यात उभे करण्यात आले.मंडळधिकारी व तलाटी यांनी पंचनामा करून तहसील मध्ये दाखल केले .सदर टिप्पर मालकाकडून दंड आकारण्यात येणार असल्याची माहीती तहसीलदार सौ.गायकवाड यांनी दिली .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा